Join us  

T20 World Cup, SA vs SL : क्विंटन डी कॉकनं अखेर गुडघे टेकले; दक्षिण आफ्रिकेनं आजच्या सामन्यात श्रीलंकेला रडवले!

गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं आजच्या सामन्यात श्रीलंकेला १४२ धावांत गुंडाळलं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 5:21 PM

Open in App

T20 World Cup, SOUTH AFRICA V SRI LANKA : दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) हा  श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अखेर #Black Lives Matter मोहीमेला पाठींबा देताना गुडघ्यावर बसला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत क्विंटननं गुडघ्यावर बसण्यास नकार देताना सामन्यातून माघार घेतली होती. त्यावेळी कर्णधार टेंबा बवुमा यानं क्विंटननं वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचे सांगितले होते, परंतु क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं क्विंटनच्या माघारीमागचं कारण सांगितलं आणि एकच गोंधळ उडाला. क्विंटनच्या या पवित्र्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान आफ्रिकेनं आजच्या सामन्यात श्रीलंकेला १४२ धावांत गुंडाळलं.  क्विंटन डी कॉकनं या गुरुवारी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची माफी मागितली होती. ''माझ्या सहकाऱ्यांची व देशातील चाहत्यांची माफी मागून मी सुरुवात करू इच्छितो. मला ही क्विंटन समस्या बनवायची नव्हती. वर्णद्वेषाविरुद्ध उभं राहायला हवं, याचं महत्त्व मी जाणतो आणि एक खेळाडू म्हणून मलाही माझी जबाबदारी समजतेय. माझ्या गुडघे टेकल्यानं कोणाच्या डोक्यात प्रकाश पडत असेल आणि इतरांचं आयुष्य सुधरत असले, तर मला ते करण्यात आनंदच होईल,''असे क्विंटन म्हणाला.  

पथूम निसंकाची एकाकी झुंज, पण...पथूम निसंकानं ५८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ७२ धावा करत श्रीलंकेला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर चरीथ असलंका ( २१) हा श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेनं त्यांचा डाव १४२ धावांवर गुंडाळला. ड्वेन प्रेटॉरियस ( ३-१७) व तब्रेझ शम्सी ( ३-१७) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. अॅनरिच नॉर्ट्जेनं दोन बळी टिपले.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१क्विन्टन डि कॉकद. आफ्रिकाश्रीलंका
Open in App