T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final : पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. त्यातील एक विकेट पाकिस्ताननं चिटींग करून मिळवली की डेव्हिड वॉर्नरच्या चुकीनं मिळवली, हा चर्चेचा विषय ठरला होता. ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शादाब खाननं ही विकेट घेतली, परंतु त्यावरून गोंधळ सुरू झाला.
अॅक्शन रिप्लेमध्ये वॉर्नरच्या बॅटला चेंडू लागला नव्हता हे स्पष्टपणे दिसत होतं. परंतु वॉर्नर याचा अंदाज घेण्यात अयशस्वी ठरला आणि विना डीआरएस घेता तो पॅव्हिलिअनमध्ये गेला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एक फेसबुक व्हिडीओ शेअर करत वॉर्नरच्या आऊट होण्यावर चर्चा केली. जेव्हा आपण हा रिप्ले पाहिला तेव्हा सर्वांप्रमाणेच आपणही आश्चर्यचकीत झाल्याचं त्यानं सांगितलं. "तो बाद होणं हे सर्वांसाठी आश्चर्यजनक होतं. सर्वांनी अपील केलं आणि अंपायरनंदेखील त्यांना आऊट दिलं," असं तो म्हणाला.
"अनेकदा फलंदाजाच्या बॅटला बॉल लागतो परंतु त्याचा अंदाज येत नाही. अनेकदा प्रतिस्पर्धकांची अंपायरची प्रतिक्रिया अशी असते की त्याचा परिणाम होऊन खेळाडू परत जातो. मला वाटतं वॉर्नरसोबतही तसंच झालं असेल. परंतु मी जेव्हा रिप्ले पाहिला तेव्हा आश्चर्यचकित झालो," असंही तो म्हणाला. वॉर्नर बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडनं नाबाद ४१ आणि मार्कस स्टोयनिसनं नाबाद ४० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ५ विकेट्सच्या जोरावर १७७ धावांचं लक्ष्य पार केलं आणि अंतिम सामन्यात धडक मारली.
Web Title: T20 World Cup Sachin Tendulkar said Why David Warner did not take DRS even after dismissal against Pakistan facebook video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.