Join us  

T20 World Cup, SCOvPNG : १२ चेंडूंत गमावले ६ फलंदाज तरीही स्कॉटलंडनं रचला इतिहास; पापुआ न्यू गिनी संघाची हॅटट्रिक!

T20 World Cup, SCOvPNG : 6 wickets off the last 12  deliveries : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध आणखी एक मोठा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 5:31 PM

Open in App

T20 World Cup, SCOvPNG : 6 wickets off the last 12  deliveries : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध आणखी एक मोठा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंड संघानं डावाच्या अखेरच्या १२ चेंडूंत ६ फलंदाज गमावले, तरीही त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांची सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. पापुआ न्यू गिनीच्या काबुआ मोरी ( Kabua Morea) यानं अखेरच्या षटकात सलग तीन विकेट्सह एकूण चार फलंदाज माघारी पाठवले. त्यानं तीन सलग विकेट मिळवून दिल्या असल्या तरी त्यात एक धावबाद असल्यानं त्याची हॅटट्रिक झाली नाही. मोरीनं ३१ धावांत ४ विकेट्स घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमधील PNGकडून पाचवी सर्वोत्तम गोलंदाजी केली.

जॉर्ज मुन्सी ( १५) व कर्णधार कायले कोएत्झर ( ६) हे लगेच माघारी परतल्यानंतर मॅथ्यू क्रॉस व रिची बेरींग्टन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावा चोपल्या. क्रॉसनं ३६ चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार व षटकार खेचून  ४५ धावा केल्या, बेरींग्टनही ४९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांवर माघारी परतला. अमिनीनं त्याला सुरेख झेल टिपला. ५ बाद १५३वरून त्यानंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला आणि त्यांना ९ बाद १६५ धावांवर समाधान मानावे लागले. अखेरच्या १२ चेंडूंत ६ फलंदाज माघारी परतले.  स्कॉटलंडची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०१६मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ५ बाद १५६ धावा केल्या होत्या.  बेरींग्टन हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडकडून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी २००७मध्ये फ्रेझर वॅट्सनं पाकिस्तानविरुद्ध ४६ धावा केल्या होत्या.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१टी-20 क्रिकेट
Open in App