Join us  

T20 World Cup, SCOvPNG : दोन सामने, दोन विजय; बांगलादेशपाठोपाठ PNGला लोळवलं आता स्कॉटलंड टीम इंडियाला भिडणार!

T20 World Cup, Scotland v Papua New Guinea : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघालाही दणका दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 7:25 PM

Open in App

T20 World Cup, Scotland v Papua New Guinea : बलाढ्य बांगलादेशला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का देणाऱ्या स्कॉटलंडनं मंगळवारी पापुआ न्यू गिनी संघालाही दणका दिला. PNGचा हा सलग दुसरा पराभव असल्यानं त्यांचे Super 12मध्ये धडकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे, तर Scotlandनं Super 12च्या दिशेनं मजबूत पाऊल टाकलं आहे. आता स्कॉटलंडनं Round 1 मधील अखेरच्या सामन्यात ओमानवर विजय मिळवल्यास ते टीम इंडियाला भिडतील. 

जॉर्ज मुन्सी ( १५) व कर्णधार कायले कोएत्झर ( ६) हे लगेच माघारी परतल्यानंतर मॅथ्यू क्रॉस व रिची बेरींग्टन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावा चोपल्या. क्रॉसनं ३६ चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार व षटकार खेचून  ४५ धावा केल्या, बेरींग्टनही ४९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांवर माघारी परतला. अमिनीनं त्याला सुरेख झेल टिपला. ५ बाद १५३वरून त्यानंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला आणि त्यांना ९ बाद १६५ धावांवर समाधान मानावे लागले. अखेरच्या १२ चेंडूंत ६ फलंदाज माघारी परतले.  स्कॉटलंडची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०१६मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ५ बाद १५६ धावा केल्या होत्या.   मोरीनं ३१ धावांत ४ विकेट्स घेत ट्वेंटी-२० क्रिकेटमधील PNGकडून पाचवी सर्वोत्तम गोलंदाजी केली.

प्रत्युत्तरात PNG ची सुरुवात खराब झाली. टोनी उरा ( २), लेगा सिएका ( ९), चार्ल्स आमिनी ( १) हे झटपट माघारी परतल्यानं त्यांची अवस्था ५ बाद ३५ अशी झाली. सेसे बाऊ ( २४) व नोर्मन वानुआ ( ४७) यांनी संघर्ष केला, परंतु तो स्कॉटलंडला पराभूत करण्यास पुरेसा ठरला नाही. PNG ला १९.३ षटकांत १४८ धावांपर्यंत मजल मारता आली. जोश डॅव्हेनं १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. आता स्कॉटलंडनं तिसऱ्या सामन्यात ओमानवर विजय मिळवल्यास B गटातून अव्वल स्थानासह ते Super 12साठी पात्र ठरतील आणि ५ नोव्हेंबरला ते टीम इंडियाला भिडतील. ( If Scotland beats Oman on 21st October then India will face Scotland on 5th November) 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बांगलादेशभारतीय क्रिकेट संघ
Open in App