T20 World Cup: निवड समिती प्रमुख चेतन शर्मा आणि त्यांची टीम ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघांची लवकरच घोषणा करणार आहेत. भारतातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने यूएई आणि ओमान येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आयसीसीच्या नियमानुसार कोरोना परिस्थितीतही फक्त १५ खेळाडू व ८ सपोर्ट स्टाफ सदस्य असा चमू प्रत्येक संघाला यूएईत घेऊन जाता येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड कप संघात १५ जणांमध्ये कोणाला एन्ट्री मिळेल याची उत्सुकता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआय निवड समिती हा संघ जाहीर करणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांत कितीही चांगली कामगिरी केली, तर वर्ल्ड कप खेळण्यास मिळणार नाही. शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि कृणाल पांड्या यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
पाकिस्तानचा जळफळाट; न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंची IPL 2021साठी दौऱ्याकडे पाठ!
InsideSportने दिलेल्या वृत्तानुसार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीच्या संघाची घोषणा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आयसीसीनं सर्व संघांना १० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे आता आयपीएलच्या कामगिरीनंतर संघ जाहीर करण्याच्या निवड समितीच्या मनसुब्यांनाच धक्का बसला आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहत होते, पण आता त्यांच्यासाठीही हा मोठा धक्का आहे. कृणाल पांड्या व भुवनेश्वर कुमार यांच्यासाठीही ही धोक्याची घंटाच आहे.
संभाव्य १५ खेळाडू ( Players who are certain for the T20 World Cup) -
- विराट कोहली
- रोहित शर्मा
- लोकेश राहुल
- सुर्यकुमार यादव
- रिषभ पंत
- रवींद्र जडेजा
- हार्दिक पांड्या
- जसप्रीत बुमराह
- मोहम्मद शमी
- मोहम्मद सिराज
- शिखर धवन ( जागा मिळवण्याच्या शर्यतीत)
- श्रेयस अय्यर ( जागा मिळवण्याच्या शर्यतीत)
- वॉशिंग्टन सुंदर ( जागा मिळवण्याच्या शर्यतीत)
- युझवेंद्र चहल ( जागा मिळवण्याच्या शर्यतीत)
- भुवनेश्वर कुमार ( जागा मिळवण्याच्या शर्यतीत)
आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याची अधिकृत घोषणा आयसीसीनं केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने चार स्टेडियमवर होतील. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायेद स्टेडियम, अबु धाबी, शाहजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड येथे सामने होतील. आठ पात्र संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या फेरीचे सामने ओमान आणि युएई येथे होतील. यातून चार संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील.