Join us  

T20 World Cup, Semi Final: भारत, पाकिस्तान यांचे उपांत्य फेरीचे प्रतिस्पर्धी ठरले; जाणून घ्या कधी व कुठे होणार हे सामने

T20 World Cup, Semi Final: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर १२ गटातील अखेरचा दिवस हा नाट्यमय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 4:58 PM

Open in App

T20 World Cup, Semi Final: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर १२ गटातील अखेरचा दिवस हा नाट्यमय ठरला. नेदरलँड्सने जाता जाता दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आणि चोकर्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. ग्रुप २ मधून भारत व आफ्रिका हे उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर होते. पण, नेदरलँड्सने आश्चर्याचा धक्का देताना पाकिस्तान व बांगलादेशला संधी दिली. बाबार आजम अँड टीमने संधीचं सोनं करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांनी बांगलादेशवर विजय मिळवला आणि भारताने झिम्बाब्वेला पराभूत करून ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान मजबूत केले. आता ICCच्या वेळापत्रकानुसार ग्रुप १ मधील अव्वल विरुद्ध ग्रुप २ मधील दुसरा आणि ग्रुप २ मधील अव्वल विरुद्ध ग्रुप १ मधील दुसरा संघ असा सामना होणार आहे.

ग्रुप १मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या प्रत्येकाच्या खात्यात ७ गुण आहेत. पण, नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडने ग्रुप १ मध्ये अव्वल व इंग्लंडने दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.  

न्यूझीलंडची कामगिरी 

  • ८९ धावांनी वि. विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • सामना रद्द वि. अफगाणिस्तान
  • ६५ धावांनी वि. विरुद्ध श्रीलंका
  • २० धावांनी पराभूत वि. इंग्लंड
  • ३५ धावांनी वि. विरुद्ध आयर्लंड

 

इंग्लंडची कामगिरी 

  • ५ विकेट्स राखून वि. विरुद्ध अफगाणिस्तान
  • ५ धावांनी ( DLS) पराभूत वि. आयर्लंड
  • सामना रद्द वि. ऑस्ट्रेलिया
  • २० धावांनी वि. विरुद्ध न्यूझीलंड
  • ४ विकेट्स राखन वि. विरुद्ध श्रीलंका

 

ग्रुप २ मधून भारत व पाकिस्तान यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत ८  गुणांसह अव्वल राहिला, तर पाकिस्तानचे ६ गुण झाले.

भारताची कामगिरी

  • ४ विकेट्स राखून वि. विरुद्ध पाकिस्तान
  • ५६ धावांनी वि. विरुद्ध नेदरलँड्स
  • ५ विकेट्सने पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • ५ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध बांगलादेश
  • ७१ धावांनी वि. विरुद्ध झिम्बाब्वे

पाकिस्तानची कामगिरी 

  • ४ विकेट्सने पराभूत विरुद्ध भारत
  • १ धावेने पराभूत विरुद्ध झिम्बाब्वे
  • ६ विकेट्स राखून वि. विरुद्ध नेदरलँड्स
  • ३३ धावांनी ( DLS) वि. विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • ५ विकेट्स राखून वि. विरुद्ध बांगलादेश 

सेमी फायनलचे वेळापत्रक

  • न्यूझीलंड- पाकिस्तान, ९ नोव्हेंबर, सिडनीवर दुपारी १.३० वाजल्यापासून 
  • भारत-इंग्लंड, १० नोव्हेंबर, एडिलेडवर दुपारी १.३० वाजल्यापासून  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडन्यूझीलंडपाकिस्तान
Open in App