T-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आज टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडसोबत होत आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता या मेगा टोर्नामेंटमध्येच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू शेन वॉर्नने भारत-पाकिस्तानसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.
शेनवार्णच्या अंदाजानुसार, सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडसोबत होऊ शकतो. तसेच, अंतिम लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ शकते. याशिवाय, अंतीम सामन्यासाठी आणखी एक पर्याय सांगताना, या टोर्नामेंटचा अंतीम सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
ग्रुप-1 मध्ये इंग्लंड, तर ग्रुप-2 मध्ये पाकिस्तान असेल टॉपवर -शेन वॉर्नच्या अंदाजानुसार, इंग्लंडचा संघ ग्रुप 1 मध्ये टॉपवर असेल. तर ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानचा संघ टॉपवर असेल. तसेच, या ग्रुपमध्ये टीम इंडिया सेमीफाइनल आणि फायनल खेळेल. भारत आणि इंग्लंड टी-20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी सर्वात मोठी दावेदार आहे, असेही शेन वॉर्णने म्हटले आहे.
आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होत आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ पाकिस्तानकडून पराभूत झाले आहेत. या दोन्ही संघांना सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.