आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात पाकिस्ताननं चार बदल केले. शनिवारी त्यांनी सीनियर खेळाडू शोएब मलिक ( Shoaib Malik) याच्या निवड केली. ३९ वर्षीय मलिकचा आधी निवडलेल्या १५ सदस्यीय पाकिस्तान संघात समावेश नव्हता. पण, सोहैब मक्सूद यानं दुखापतीमुळे माघार घेतली अन् मलिकला लॉटरी लागली. मलिकाच्या पुनरागमनचा आनंद साजरा करताना पाकिस्तानच्या सामा टीव्हीनं हास्यास्पद व्हिडीओ तयार केला. १९९९मध्ये मलिकनं पदार्पणं केलं आणि पाकिस्तानातील सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये त्याचे नाव आहे.
२००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात मलिक हा पाकिस्तानचा कर्णधार होता आणि २००९च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो सदस्य होता. त्याशिवाय त्यानं २०१२, २०१४ व २०१६च्या स्पर्धेतही संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी निवड समितीनं युवा खेळाडूंवर भरवसा दाखवत त्याला संघाबाहेर ठेवले. मलिकनं मागील वर्षभरात जगभरातील ट्वेंटी-२० लीगमध्ये प्रतिनिधित्व करताना ४९ सामन्यांत ३०.८५च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धा खेळण्याचा विक्रम मलिकनं केला आहे. त्यानं दोन वन डे वर्ल्ड कप ( २०११ व २०१५), सहा चॅम्पियन्स ट्रॉफी व सहा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
पाहा व्हिडीओ...