T20 World Cup, Sri Lanka vs Netherlands Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नामिबियाकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर श्रीलंकेने आज चांगला खेळ केला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेची सुरुवात काही खास झाली नाही. पण, कुसल मेंडिस व चरिथ असलंका यांनी दमदार खेळ करताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. या सामन्यापूर्वी दुष्मंथा चमिराला हॅमस्ट्रींगमुळे माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी कसून रजिथाचा समावेश झाला. आघाडीचा फलंदाज दानुष्का गुणथिलका यानेही माघार घेतलीय. आशेन बंदाराचा त्याच्याजागी समावेश केला गेला आहे. तरीही श्रीलंकेने कडवी टक्कर दिली.
पथूम निसंका ( १४) व धनंजया डी सिल्वा ( ०) यांना सलग दोन चेंडूं पॉल व्हॅन मिकेरेन ( Paul van Meekeren) माघारी पाठवून श्रीलंकेची कोंडी केली होती. सुपर १२मधील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत अनुभवी मेंडिस व असलंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
असलंका ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर मेंडिसने खिंड लढवली. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. २०व्या षटकात तो बाद झाला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी कुमार संगकाराने २००९मध्ये भारताविरुद्ध ७८ धावा केल्या होत्या. भानुका राजपक्षानेही १९ धावांचे योगदान देत श्रीलंकेला ६ बाद १६२ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला. पॉल व्हॅनने दोन, बॅस डे लिडने दोन विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, SL vs NED : Kusal Mendis (79), Charith Asalanka (31) power SRI LANKA to 162/6 vs NETHERLANDS, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.