Join us  

T20 World Cup, SL vs NED : जबरदस्त कमबॅक! आशिया चषक विजेत्या श्रीलंकेची Super 12 मध्ये थाटात एन्ट्री

T20 World Cup, Sri Lanka vs Netherlands Live : आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेने ब गटातील आजच्या सामन्यात नेदरलँड्सवर थरारक विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 1:04 PM

Open in App

T20 World Cup, Sri Lanka vs Netherlands Live : आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेने A गटातील आजच्या सामन्यात नेदरलँड्सवर थरारक विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखले.  कुसल मेंडिस व चरिथ असलंका यांनी दमदार खेळ करताना संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिले. त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांच्यावरील जबाबदारी चोख पार पाडली. नेदरलँड्सच्या मॅक्स ओ'डाऊडने ( Max O'Dowd) अखेरपर्यंत संघर्ष केला. त्याने ५३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार मारून नाबाद ७१ धावा केल्या. श्रीलंकेने हा विजय मिळवून सुपर १२ मध्ये प्रवेश पक्का केला. 

पथूम निसंका ( १४) व धनंजया डी सिल्वा ( ०) यांना सलग दोन चेंडूं पॉल व्हॅन मिकेरेन ( Paul van Meekeren) माघारी पाठवून श्रीलंकेची कोंडी केली होती. सुपर १२मधील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत अनुभवी मेंडिस व असलंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. असलंका ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर मेंडिसने खिंड लढवली. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. २०व्या षटकात तो बाद झाला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या यष्टिरक्षकाने केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी कुमार संगकाराने २००९मध्ये भारताविरुद्ध ७८ धावा केल्या होत्या.  भानुका राजपक्षानेही १९ धावांचे योगदान देत श्रीलंकेला ६ बाद १६२ धावांचा सन्मानजनक पल्ला गाठून दिला. पॉल व्हॅनने दोन, बॅस डे लिडने दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात २३ धावांवर नेदरलँड्सला पहिला धक्का बसला. विक्रमजीत सिंग ( ७) याला महिष थिक्सानाने बाद केले. त्यानंतर लाहिरू कुमारा व वनिंदू हसरंगा यांनी धक्के देताना नेदरलँड्सची अवस्था ३ बाद ४७ अशी केली. बॅस दे लिड ( १४) व कॉलिन अॅकरमन ( ०) माघारी परतल्यानंतर मॅक्स ओ'डाऊड व टॉम कूपर यांनी श्रीलंकेला आव्हान दिले, परंतु रन रेट हा वाढत होता. त्यात २५ धावांची ही भागीदारी थिक्सानाने संपुष्टात आणताना कूपरचा ( १६) त्रिफळा उडवला.

कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नेट्समध्ये सराव केलेले स्वीप शॉट्स वनिंदू हसरंगाला लगावले आणि स्क्वेअर लेगला दोन चौकार खेचून सामन्यात प्रथमच एका षटकात ११+ धावा कुटल्या. मॅक्स दुसऱ्या बाजूने विकेट सांभाळून खेळत होताच. या दोघांची १८ चेंडूंत २८ धावांची भागीदारी बिनुरा फर्नांडोने संपुष्टात आणली.  स्कॉट १५ चेंडूंत २१ धावांवर त्रिफळाचीत झाला. थिक्साना व वनिंदू यांनी नंतर नेदरलँड्सला धक्का देण्याचे सत्र सुरू ठेवले. मॅक्सने १८व्या षटकात ६,४,४ अशी फटकेबाजी करून ४०  चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. १२ चेंडूंत ३९ धावा हव्या अस ताना थिक्सानाच्या नो बॉवर मॅक्सने षटकार खेचला. त्यानंतर थिक्सानाने सलग दोन Wide बॉल टाकले. 

६ चेंडूंत २३ धावा हव्या असतानान मॅक्सला पहिल्या दोन चेंडूवर एक धाव करता आली. नेदरलँड्सला ९ बाद १४६ धावा करता आल्या आणि श्रीलंकेने १६ धावांनी सामना जिंकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२श्रीलंका
Open in App