T20 World Cup: ICC ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ खेळाडू, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज... असे अनेक विक्रम सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नोंदवले आहेत. त्याच्या बॅटीचा तडाखा जवळपास सर्वच गोलंदाजांना बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा Mr 360 अशी ओळख आता सूर्याने बनवली आहे, पण त्याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मुंबईतूनच तयारी केली होती आणि त्यासंदर्भातील इंटरेस्टींग स्टोरी समोर आली आहे.
मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेला आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्डकप गाजवतोय. सूर्याचा फॉर्म प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारा आहेच. सूर्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय मुंबईतील मरीन लाईन्स येथील पारसी जिमखाना येथील हिरव्यागार आणि बाऊन्सी खेळपट्ट्यावरील सरावाला जाते. ज्येष्ठ पत्रकार मकरंद वायंगणकर यांनी एक ट्विट करून याबाबतची मजेशीर स्टोरी सर्वांसमोर आणली. सूर्या ऑस्ट्रेलियातील खेळपट्टींवर वादळ आणतोय आणि त्याची तयारी त्याने पारसी जिमखान्यातून केली.
"Suryakumar Yadav खेळला नाही, तर भारताला १४०-१५० धावा करणेही मुश्कील होईल!"
''ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याने पारसी जिमखाना क्रिकेट सेक्रेटरी खोदादाद यांना ग्रीन टॉप बाऊन्सी खेळपट्टी (पीच) बनवण्याची विनंती केली. तसेच सरावासाठी जलदगती गोलंदाज उपलब्ध करून दिले. जिमखान्याचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी सलामीवीर विनायक माने यांनी त्या गोलंदाजांकडून सूर्यकुमारचा सराव करून घेतला. चार तासांच्या सरावात त्याने प्रशिक्षक माने यांच्या प्रत्येक सूचनेचे पालन केले. सूर्याने येथे सर्वच फटक्यांचा (स्ट्रोक) सराव केला. मी पॅव्हेलियनच्या पहिल्या मजल्यावरून पाहिलं तेव्हा ती वेडेपणाची पद्धत आहे, असे मला वाटले. मात्र, सूर्याच्या अनोख्या सरावाला दाद द्यायला हवी. त्याने त्याने त्याचा सार्थकी लावला,'' असे वायंगणकर यांनी ट्विट केले.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही सूर्याने मधल्या फळीचा भार आपल्या खांद्यावर उचलला आहे आणि त्याना १९४+च्या स्ट्राईक रेटने ५ सामन्यांत २२५ धावा चोपल्या आहेत. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली ( २४६) व मॅक्स ओ'डाऊड ( २४२) यांच्यानंतर सूर्याचाच नंबर येतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup: Surykumar Yadav's preparations for the World Cup started from Mumbai; read interesting story
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.