T20 World CUP: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यासाठी सिडनी येथे दाखल झाला. मेलबर्नवरील ऐतिहासिक विजयानंतर आता भारतासमोर २७ ऑक्टोबरला नेदरलँड्सचे आव्हान असणार आहे. पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, विराट कोहली यांनी आपली छाप पाडली. लोकेश राहुल दुर्देवीरित्या बाद झाला, परंतु त्याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. सिडनीत आज पार पाडलेल्या सराव काही काळ पावसाने व्यत्यय आणला. लोकेशसह विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल यांनी सराव सत्रात घाम गाळला.
भारतीय संघाने चाहत्याचे ६ लाख रुपये वाचवले; IND vs PAK सामन्यात मैदानावर नेमके असे काय घडले?
मात्र, सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी आराम करण्याचा निर्णय घेतल्या. त्यांच्यासह जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग यांनी सराव सत्रातून विश्रांती घेतली. ग्रुप २ मध्ये बांगलादेश सरस रन रेटच्या जोरावर अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सोमवारी त्यांनी नेदरलँड्सवर विजय मिळवला. या निकालानंतर बांगलादेशने +०.४५०च्या नेट रन रेटने ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे आणि +०.०५० नेट रन रेट असलेल्या भारताला दुसऱ्या स्थानावर सरकावे लागले. दक्षिम आफ्रिका व झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यामुळे दोघांनाही प्रत्येकी १ गुणासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
विराट कोहली, रोहित शर्माचा मेसेज; टीम इंडियानं रद्द केली दिवाळीची खास डिनर पार्टी! नेमकं काय घडलं?
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"