Join us  

T20 World Cup : सहकाऱ्यांनी एक चकार शब्द नाही काढला, मोहम्मद शमीच्या समर्थनात पाकिस्तानचा Mohammed Rizwan धावाला

T20 World Cup: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाला अन् काही लोकांनी मोहम्मद शमीला ( Mohammed Shami) त्यासाठी जबाबदार धरून टीका सुरू केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 8:23 PM

Open in App

T20 World Cup: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाला अन् काही लोकांनी मोहम्मद शमीला ( Mohammed Shami) त्यासाठी जबाबदार धरून टीका सुरू केली. सोशल मीडियावरून शमीवर खालच्या पातळीची टीका करण्यात आली. विरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर, युझवेंद्र चहल हे सर्व शमीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पण, वर्ल्ड कप खेळणाऱ्या टीम इंडियातील एकाही सदस्यानं टीकाकारांविरोधात एक चकार शब्दही काढला नाही. ४८ तासांनंतर बीसीसीआयनं ट्विट करून शमीला धीर दिला, पण त्याआधी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan ) शमीच्या मदतीला धावला.

पाकिस्तानचा सलामीवीर व यष्टिरक्षक-फलंदाज रिझवान यानं मोहम्मद शमीवर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. त्यानं सोशल मीडियावर कठोर शब्दांत त्यांचे कान टोचले आणि क्रिकेट लोकांना एकत्र आणतो, त्यांची विभागणी करत नाही, असे ठाम मत व्यक्त केले. भारतानं ठेवलेलं १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता पार केले. रिझवानं या सामन्यात सर्वाधिक ७९, तर कर्णधार बाबर आजमनं ६८ धावा केल्या. मोहम्मद शमीनं ३.५ षटकांत ४४ धावा दिल्या.  

मोहम्मद रिझवान काय म्हणाला?''प्रचंड दडपण, खाचखळगे आणि त्याग एक खेळाडू आपल्या देशासाठी करतो आणि त्याचीच माणसं त्याला समजून घेत नाही. मोहम्मद शमी हा स्टार आहे आणि तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. कृपया तुमच्या स्टारचा तुम्ही आदर करा. हा खेळ लोकांना एकत्रित आणतो, त्यांच्यात तेढ निर्माण करत नाही,''असे रिझवाननं ट्विट केलं.  भारत-पाकिस्तान लढतीत काय झालं?भारताकडून विराट कोहली ( ५७) व रिषभ पंत ( ३९) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. रोहित शर्मा गोल्डन डकवर माघारी परतला, लोकेश राहुल ( ३) व सूर्यकुमार यादव ( ११) हेही अपयशी ठरले. तरीही भारतानं ७ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानच्या बाबर आजमनं ( Babar Azam) ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८, तर मोहम्मद रिझवाननं ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७८ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मोहम्मद शामीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App