नवी दिल्ली : आयपीएल स्थगित करण्यात आल्यामुळे क्रिकेट अभेद्य नसल्याची कल्पना येते आणि भारतात होणारी आगामी टी-२० विश्वकप स्पर्धा कोरोनामुळे स्थगित किंवा अन्य स्थानावर आयोजित केल्या जाऊ शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज इयान चॅपेलने व्यक्त केले. कडक जैव सुरक्षित वातावरणानंतरही (बायो बबल) सनरायझर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि कोलकाता नाइट रायडर्सचे वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले. चॅपेलने वृत्तसंस्थेला लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले की,‘नागरिकांमध्ये कोरोना संक्रमण वाढल्यामुळे आणि मृत्यू व काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आयपीएल २०२१ स्थगित करण्यात आले. त्यामुळे हा खेळ अभेद्य नसल्याचे सिद्ध झाले.’भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे. रोज चार हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. भारतातच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन होणार आहे.
- चॅपेल म्हणाले,‘सध्याचे वातावरण बघता वर्षाच्या शेवटी भारतात होणारी टी-२० विश्वकप स्पर्धा स्थगित करणे किंवा अन्य स्थळावर आयोजित करणे हा पर्याय पुढे येऊ शकतो. यापूर्वीही विविध कारणांमुळे खेळ प्रभावित झाला आहे. त्याच्या काही कथा आहेत. त्यातील काही दु:खद, तर काही मनोरंजक आहेत.’