T20 World Cup, Virat Kohli Dance : टीम इंडियानं (Indian Cricket Team) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दिवाळीच्या मूहूर्तावर पहिल्या विजयाची नोंद केली. बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात विराट कोहली अँड कंपनीनं ६६ धावांनी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांच्या आतषबाजीनं भारतीय चाहते प्रचंड आनंदात होते. भारत जिंकतोय हे पाहून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हाही खूश होता आणि क्षेत्ररक्षण करताना तो ‘माय नेम इज लखन’ या अनिल कपूरच्या गाण्यावर थिरकला.
रोहित ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचून ७४ धावांवर माघारी परतला. लोकेश ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करून माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला. अफगाणिस्तानला ७ बाद १४४ धावा करता आल्या आणि भारतानं ६६ धावांनी हा सामना जिंकला. मोहम्मद शमीनं ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
क्षेत्ररक्षण करताना मैदानात लागलेल्या हिंदी गाण्यांवर विराट थिरकला. यावेळी त्याला प्रेक्षकांनी फोर्स केल्याचंही पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ...