T20 World Cup : विरेंद्र सेहवागने विचारला निवड समितीला जाब

निवड समितीला जाब विचारण्यासाठी आता सेहवाग पुढे सरसावला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 09:47 AM2021-09-29T09:47:29+5:302021-09-29T09:48:25+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Virender Sehwag asks questions to the selection committee | T20 World Cup : विरेंद्र सेहवागने विचारला निवड समितीला जाब

T20 World Cup : विरेंद्र सेहवागने विचारला निवड समितीला जाब

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देनिवड समितीला जाब विचारण्यासाठी आता सेहवाग पुढे सरसावला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातला अनुभवी लेगस्पीनर युझवेंद्रल चहलला टी-२० विश्वचषकासाठीच्या संघातून वगण्यात आले होते. निवड समितीच्या या निर्णयावर बरीच टीकाही झाली होती. त्यात चहल यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतो आहे. त्यामुळे निवड समितीला जाब विचारण्यासाठी आता सेहवाग पुढे सरसावला आहे. 

चहलला न निवडण्याबाबत सेहवाग म्हणाला की, ‘चहल हा भारताच्या टी-२० संघातला महत्त्वाचा घटक आहे. मोक्याच्या क्षणी बळी घेण्यात तो वाकबगार आहे. त्यामुळे त्याला भारताच्या टी-२० संघात स्थान मिळायला हवे होते. त्याला संघात न घेण्याबाबत निवड समितीने स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण चहल हा असा गोलंदाज आहे की त्याला बळी कसे घ्यायचे, याची जाण आहे. तसेच भारतासाठी त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.’ 

राहुल चहरच्या निवडीबाबत सेहवाग म्हणाला की, ‘असे पण नाही की राहुल चहरने श्रीलंका दौऱ्यात खूपच अप्रतिम कामगिरी वगैरे केली आहे.’ क्रिकबझ या संस्थेशी बोलताना सेहवागने आपले हे मत व्यक्त केले.

Web Title: T20 World Cup Virender Sehwag asks questions to the selection committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.