७ क्रमांकाची जर्सी म्हटली की डोळ्यासमोर उभा राहतो महेंद्रसिंग धोनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो. १० क्रमांकाची जर्सी म्हटलं की लिओनेल मेस्सी किंवा सचिन तेंडुलकर ही नावं चटकन आपल्या तोंडावर येतात. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याची ४५ क्रमांकाची जर्सीही क्रिकेट फॅन्समध्ये प्रचंड फेमस आहे. पण, रोहितनं जर्सीवर ४५ हा क्रमांकच का निवडला?, याचा खुलासा उपकर्णधार रोहितनं शुक्रवारी केला. भारतीय संघ आज स्कॉटलंडचा सामना करणार आहे. अनेक खेळाडूंसाठी जर्सीवरील नंबर हा अंकशास्त्राचा भाग आहे, परंतु रोहितसाठी ते भावनिक नातं आहे.
आईच्या सांगण्यावरून रोहितनं ४५ क्रमांकाची जर्सी परिधान केली आणि १४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत तो जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये १५ हजाराहून अधिक धावा आहेत.
''४५ क्रमांकच का?, कारण तो माझ्या आईला आवडतो. कोणता नंबर निवडू, असे मी जेव्हा आईला विचारले. तेव्हा तिनं ४५ क्रमांक सांगितला. तो तुझ्यासाठी चांगला ठरेल, असे ती म्हणाली होती,''असे रोहितनं सांगितले. २००७मध्ये रोहितनं ४५ क्रमांकाची जर्सी घालून आंतरराष्ट्रईय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं आहेत.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ( Rahul Dravid) विराजमान होणार असल्याचे बीसीसीआयनं बुधवारी जाहीर केले. राहुलचीही
रोहित शर्मा यालाच मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून पसंती आहे.
Indian Express नं दिलेल्या वृत्तानुसार राहुलला मुलाखतीत बीसीसीआयनं प्रश्न विचारला आणि त्यावर त्यानं रोहित शर्माचं नाव घेतलं. रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटचं विपुल अनुभव आहे आणि तो या प्रकारात स्टार आहे, त्यामुळे त्याची टीम इंडियाचा पुढील कर्णधार म्हणून निवड व्हायला हवी, असे द्रविडनं म्हटलं. तसंच रोहितच्या छत्रछायेखाली लोकेश राहुलला उप कर्णधारपद द्यावं, त्याच्याकडे कर्णधारपदाची क्षमता आहे, असेही द्रविड म्हणाला.
Web Title: T20 World Cup: Why does Rohit Sharma wear Jersey No 45? India’s vice-captain reveals reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.