T20 World Cup, WI vs BAN : किरॉन पोलार्ड अचानक Retired Hurt झाला अन् बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचं वस्त्रहरण, Video 

T20 World Cup, WEST INDIES V BANGLADESH : २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज संघाची अवस्था वाईट झालेली पाहायला  मिळत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:22 PM2021-10-29T17:22:50+5:302021-10-29T17:24:42+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, WI vs BAN : Kieron Pollard retired himself out, and on the very next ball, Andre Russell is run out at the non-strikers' end, WI 142/7 | T20 World Cup, WI vs BAN : किरॉन पोलार्ड अचानक Retired Hurt झाला अन् बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचं वस्त्रहरण, Video 

T20 World Cup, WI vs BAN : किरॉन पोलार्ड अचानक Retired Hurt झाला अन् बांगलादेशकडून वेस्ट इंडिजचं वस्त्रहरण, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, WEST INDIES V BANGLADESH : २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज संघाची अवस्था वाईट झालेली पाहायला  मिळत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१त विंडीजला सलग दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे आणि स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहेत. पण, उर्वरित सामन्यांत त्यांच्याकडून संघर्षाची असलेली अपेक्षाही फोल ठरतेय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही विंडीजचा निम्मा संघ ६२ धावांवर माघारी परतला आहे. संघ अडचणीत असताना कर्णधार किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) अचानक रिटायर्ड हर्ट (retired hurt) झाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, हा पहिला धक्का होता, त्यानंतर जे घडले, ते विंडीजला आणखी धक्का देणारे ठरले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजला आजही साजेशी सुरुवात करता आली नाही. एव्हिन लुईस ( ६) व ख्रिस  गेल ( ४) ही जोडी आज सलामीला आली. फॉर्माशी झगडणाऱ्या गेलला सलामीला पाठवून काही तरी फरक पडेल असे वाटले होते, परंतु महेदी हसननं त्याचा त्रिफळा उडवला. मुस्ताफिजूर रहमाननं लुईसला आधीच माघारी पाठवले होते. आज पदार्पण करणाऱ्या रोस्टन चेसनं डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय परंतु त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळत नाहीय...शिमरोन हेटमायर ( ९) हाही महेदी हसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मागील दोन सामन्यांत पोलार्डनं एकट्यानं खिंड लढवली होती, पण आजच्या सामन्यात १६ चेंडूंत ८ धावा करून तो रिटायर्ड हर्ट झाला. 

आपल्या बॅटीतून आज धावा होणं शक्य नाही, असे कदाचित त्याला वाटले असावे म्हणून त्यानं मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानं आंद्रे रसेल फलंदाजीला आला खरा परंतु एकही चेंडू न खेळता त्याला माघारी जावं लागलं, रोस्टन चेसनं मारलेला सरळ फटका गोलंदाज तस्कीन अहमदनं पायानं अडवण्याचा प्रय्तन केला आणि तो चेंडू त्याच्या पायाला लागून नॉन स्ट्रायकर एंडच्या यष्टींवर आदळला. नॉन स्ट्राईकवर असलेला रसेल बराच पुढे आला होता आणि तो धावबाद झाला. विंडीजचा निम्मा संघ ६२ धावांवर माघारी परतला. 

पाहा नेमकं काय घडलं...



रोस्टन चेस व निकोलस पूरन यांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी करून विंडीजचा धावफलक हलता ठेवला. पण, १९व्या षटकात शोरीफुल इस्लामनं सलग दोन चेंडूंत दोन्ही सेट फलंदाजांना बाद केले. निकोलस २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकार खेचून ४० धावांवर झेलबाद झाला, तर चेस ३९ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे विंडीजचा संघ पुन्हा बॅकफुटवर फेकला गेला. या सामन्यात बांगलादेशच्या खेळाडूंनी तीन सोपे झेल सोडल्यानं विंडीजला या धावा तरी करता आल्या. रिटायर्ड हर्ट झालेला पोलार्ड २०व्या षटकात पुन्हा मैदानावर आला. मुस्ताफिजूरच्या अखेरच्या षटकात तीन खणखणीत षटकार खेचले गेले आणि विंडीजनं ७ बाद १४२ धावा उभ्या केल्या. मुस्ताफिजूर ( २-४३), महेदी हसन ( २-२७) व  शोरीफुल इस्लाम ( २-२०) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

Web Title: T20 World Cup, WI vs BAN : Kieron Pollard retired himself out, and on the very next ball, Andre Russell is run out at the non-strikers' end, WI 142/7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.