Team India Return : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ विजेत्या भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांची भेट घेतली. टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी रोहितसेनेचे कौतुक केले. भारतीय संघाने बार्बाडोसच्या धरतीवर विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. गुरुवारी सकाळी टीम इंडिया राजधानी दिल्लीत पोहोचली. आज संध्याकाळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येईल. इथे खेळाडूंच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. याशिवाय सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय संघातील शिलेदारांचा व्हिडीओ समोर आला आहे. मोदी खेळाडूंशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र, ट्रॉफीसोबत फोटो काढताना नरेंद्र मोदींनी ट्रॉफी न धरता कर्णधार रोहित शर्मा आणि मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हात धरला. मोदींची ही कृती सर्वांचे लक्ष वेधत आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना खुशखबर दिली. खरे तर वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना मोफत एन्ट्री मिळणार आहे. गेट नंबर २, ३ आणि ४ मधून दुपारी चार वाजल्यापासून चाहत्यांना वानखेडेमध्ये प्रवेश मिळेल. टीम इंडियाची आज सायंकाळी मुंबईत विजयी परेड होणार आहे. याआधी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतीय क्रिकेट संघाने ७, लोककल्याण मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २९ जून रोजी बार्बाडोस येथे ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचली.
Web Title: t20 world cup winner team india PM Narendra Modi didn't hold the World Cup trophy, instead held Rohit and David's hands, watch here video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.