Join us  

लखनौ सुपर जायंट्स गौतम गंभीरची साथ सोडणार? वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकाची एन्ट्री होणार

महेंद्रसिंग धोनीनंतर इंडियन प्रीमिअऱ लीग २०२३ मध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातल्या वादाची...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 2:42 PM

Open in App

लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शन गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात भर मैदानात कडाक्याचं भांडण झालं होतं. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने या दोघांची १०० टक्के मॅच फी दंड म्हणून वसूल केली. त्यानंतरही गंभीर या वादावर कमेंट करून चर्चेत होता. आता त्याची पुन्हा चर्चा रंगलीय आणि यावेळी त्याच्यासोबत LSG प्रवास संपवणार असे वृत्त समोर येतेय. IPL 2023 मधील लखनौ (LSG) संघाचा प्रवास गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर संपला. 

संघाने पुढील आयपीएल हंगामाची तयारीही सुरू केली आहे. यासाठी त्यांनी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रँचायझी LSGने आयपीएल २०२४मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाची जबाबदारी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन महान फलंदाज आणि माजी प्रशिक्षक जस्टिन लँगरशी संपर्क साधला आहे. LSG व्यवस्थापनाने जस्टिन लँगरशी विस्तृत चर्चा केली आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर तो पुढील वर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेऊ शकतील. संजीव गोएंका यांच्या फ्रँचायझीला मुख्य प्रशिक्षकाची गरज आहे, कारण सध्याचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्यासोबतचा दोन वर्षांचा करार IPL 2023 नंतर संपला आहे. 

सँडपेपर घोटाळ्यानंतर जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियन संघाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने स्टार खेळाडूंशिवायही चमत्कार करून दाखवले. त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ जिंकला. त्यांच्या प्रशिक्षणाखाली पर्थ स्कॉचर्सने त्यांच्या पहिल्या चार वर्षांत तीन बिग बॅश लीग विजेतेपदे जिंकली. LSG आणि जस्टिन लँगर यांच्यातील बोलणी चांगली राहिल्यास, तो मॉर्नी मॉर्केल, जॉन्टी रोड्स आणि विजय दहिया यांच्यासह LSGच्या  कोचिंग स्टाफचा भाग होईल. LSG आयपीएल २०२२ मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरले होते आणि आयपीएल २०२३ च्या एलिमिनेटरमध्ये त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.  

दरम्यान, मेंटॉर गौतम गंभीरच्याही बदलीची चर्चा आहे आणि तो पुन्हा कोलकाता नाइट रायडर्ससोबत काम करताना दिसेल असेही बोलले जातेय. 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सगौतम गंभीर
Open in App