Join us  

जोस बटलरने T20 World Cup विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना आदिल रशीद, मोईन अली यांना जाण्यास सांगितले, Video 

T20 World Cup World Cup winning celebration : इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इतिहास घडविताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:56 AM

Open in App

T20 World Cup World Cup winning celebration : इंग्लंडने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर इतिहास घडविताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. पाकिस्तानवर ५ विकेट्स राखून विजय मिळवताना इंग्लंडने २०१०नंतर पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला. वेस्ट इंडिजनंतर दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा तो दुसरा संघ ठरला, परंतु एकाच वेळी वन डे व ट्वेंटी-२० असे वर्ल्ड कप नावावर असलेला जगातील पहिलाच संघ ठरला. पाकिस्तानच्या ८ बाद १३७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने जल्लोष केला आणि त्यावेळी कर्णधार जोस बटलरच्या ( Jos Buttler) एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधले.

आयसीसीने जाहीर केला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम संघ; हार्दिक पांड्या बारावा खेळाडू!

 

आदिल रशीद, स‌ॅम करन, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह नाबाद ५२ धावा  करून इंग्लंडचा विजय पक्का केला. सॅम करनने १२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  रशीदने ४-१-२२-२ आणि ख्रिस जॉर्डनने ४-०-२७-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. पाकिस्तानने ११ षटकांत २ बाद ८४ धावा केल्या होत्या, परंतु पुढील ९ षटकांत त्यांनी ५३ धावांत ६ विकेट्स गमावल्या. इंग्लंडकडून जोस बटलर ( २६), मोईन अली ( १९) व हॅरी ब्रुक ( २०) यांनी चांगला खेल केला. फिल सॉल्ट( १०), अॅलेक्स हेल्स ( १) यांनी निराश केले. 

 

या विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ८० हजारांहून अधिक प्रेक्षकांसमोर विजयी जल्लोष केला. जेतेपदाची ट्रॉफी हाती घेतल्यानंतर जोस बटलरने खेळाडूंना एकेक करून ती ट्रॉफी हातात देऊन जल्लोष करण्यास सांगितले. फोटो सेशनही झाली, परंतु अचानक जोसने शेजारीच असलेल्या आदिल रशीद व मोईन अली यांना खुणावले आणि दोघंही खेळाडू सेलिब्रेशनमधून बाहेर गेले.

पाहा व्हिडीओ...

जोसने या दोघांना बाहेर जाण्यास सांगितले कारण लिएम लिव्हिंगस्टोन शॅम्पेन घेऊन उभा होता. रशीद व अली हे मद्यप्राशन करत नाही आणि मुस्लीम धर्मात मद्यसेवन व्यर्ज आहे. त्यामुळे त्यांच्या धर्माचा मान राखण्यासाठी जोसने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"       

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२इंग्लंडपाकिस्तानजोस बटलर
Open in App