T20 विश्वचषक 2022 च्या गट 2 च्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बुधवारी एका रोमांचक सामन्यात बांगलादेशचा 5 धावांनी पराभव केला. सामन्यात पाऊस पडला तेव्हा बांगलादेशला 16 षटकांत 151 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. पावसापूर्वी बांगलादेशने 7 षटकात एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या होत्या आणि डीएलएस नियमानुसार ते 17 धावांनी आघाडीवर होते. परंतु जेव्हा पाऊस थांबल्यानंतर जेव्हा सामना सुरू झाला त्यानंतर त्यांच्या विकेट्स पडत गेल्या आणि अखेरिस भारतानं विजय मिळवला. सुधारित लक्ष्य दिले जात असताना शाकिब अल हसन अंपायर आणि रोहित शर्मासोबत बराच वेळ वाद घालताना दिसल्याचीही या दरम्यान चर्चा सुरू होती.
या वादाच्या संदर्भात एका पत्रकाराने पत्रकार परिषदेत शकिब अल हसनला एक प्रश्न विचारला. परंतु पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास शकिब अल हसनने संकोच केला असता, तुम्ही बांगलादेशात वाहणाऱ्या नदीबाबत चर्चा करत होता का, असा सवाल केला. वास्तविक, शाकिब ज्या पद्धतीने अंपायरशी चर्चा करत होता, त्यावरून त्याला पुढे सामना खेळायचा नव्हता असेच वाटत होते. तो आपला मुद्दा पंचापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता, पण असे न होता बांगलादेशच्या संघाला सामना खेळावाच लागला.