T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेनेअष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा ( Sikandar Raza) याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभव केला. रजाने चार षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे सामना फिरला. त्याला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पराभवाकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने पाकिस्तानीने पाकिस्तान संघाला पराभूत केले.
T20 World Cup : Shoaib Akhtar ने भारतीय संघाला दिला 'शाप'! म्हणाला, तुम्ही काय तीस मार खान नाही आहात, उद्या...
३६ वर्षीय सिकंदर रजा याचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट येथील आहे. २००२मध्ये सिकंदर आई-वडिलांसह झिम्बाब्वेला राहायला गेला. २००७मध्ये त्याने तेथे प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१०-११मध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पूर्णवेळ क्रिकेटमध्ये झोकून दिले. त्याने ४१च्या सरासरीने ६२५ धावा केल्या. ६३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रजाच्या नावावर ६ अर्धशतकांसह ११८५ धावा आहेत. गोलंदाजीतही त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. १२३ वन डे सामन्यांत त्याने ३६५६ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं, २० अर्धशतकांचा समावेश आहे आणि ७० विकेट्सही घेतल्या आहेत.
झिम्बाब्वे-पाकिस्तान सामन्यात काय झालं?झिम्बाब्वेने ८ बाद १३० धावा केल्या. वेस्ली मॅधेव्हेर ( १७) व क्रेग एर्व्हिन ( १९) यांनी आक्रमक सुरूवात केली, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. सिन विलियम्स ( ३१) याने चांगला संघर्ष केला. रायन बर्ल ( १०) व ब्रॅड एव्हान्स ( १९) यांचेही योगदान लाभले. पाकिस्तानच्या मोहम्मद वासीमने ४ आणि शादाब खानने ३ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान ( १४) व बाबर आजम (४) अपयशी ठरले. इफ्तिखार अहमद ( ५) व हैदर अली (० ) यांनीही निराश केले. शान मसूद ४४ धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरू ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि १ चेंडूंत ३ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला. पाकिस्तानला ८ बाद १२९ धावा करता आल्या. सिकंदर रजाने ३ व ब्रॅड इव्हान्सने २ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, ZIM vs PAK : Pakistan-born Sikandar Raza became a hero of Zimbabwe's historical win against Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.