T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेनेअष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा ( Sikandar Raza) याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभव केला. रजाने चार षटकांत २५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे सामना फिरला. त्याला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या पराभवाकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने पाकिस्तानीने पाकिस्तान संघाला पराभूत केले.
३६ वर्षीय सिकंदर रजा याचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट येथील आहे. २००२मध्ये सिकंदर आई-वडिलांसह झिम्बाब्वेला राहायला गेला. २००७मध्ये त्याने तेथे प्रथम क्षेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०१०-११मध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पूर्णवेळ क्रिकेटमध्ये झोकून दिले. त्याने ४१च्या सरासरीने ६२५ धावा केल्या. ६३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रजाच्या नावावर ६ अर्धशतकांसह ११८५ धावा आहेत. गोलंदाजीतही त्याने ३६ विकेट्स घेतल्या आहेत. १२३ वन डे सामन्यांत त्याने ३६५६ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं, २० अर्धशतकांचा समावेश आहे आणि ७० विकेट्सही घेतल्या आहेत.
पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान ( १४) व बाबर आजम (४) अपयशी ठरले. इफ्तिखार अहमद ( ५) व हैदर अली (० ) यांनीही निराश केले. शान मसूद ४४ धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरू ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि १ चेंडूंत ३ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला. पाकिस्तानला ८ बाद १२९ धावा करता आल्या. सिकंदर रजाने ३ व ब्रॅड इव्हान्सने २ विकेट्स घेतल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"