T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांचं 'ट्विट' पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झोंबलं; दोघांमधील वादाची वीरुने घेतली मजा

T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानण्यास त्यांनी भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:06 AM2022-10-28T10:06:23+5:302022-10-28T10:07:01+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, ZIM vs PAK :Pakistan PM Shehbaz Sharif , Zimbabwe’s President Emmerson Damdudzo Mnangagwa exchange jibes after Zimbabwe stuns Pakistan, Virender Sehwag joins the FUN  | T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांचं 'ट्विट' पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झोंबलं; दोघांमधील वादाची वीरुने घेतली मजा

T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांचं 'ट्विट' पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झोंबलं; दोघांमधील वादाची वीरुने घेतली मजा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानण्यास त्यांनी भाग पाडले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभूत होण्याची ही पाकिस्ताची दुसरी वेळ आहे. २०१०मध्ये न्यूझीलंडने त्यांना असे पराभूत केले होते, परंतु काल झालेला हा पराभव पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे. भारताकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान या सामन्यातून कमबॅक करेल अशी अपेक्षा होती, परंतु झिम्बाब्वेने अनपेक्षित कामगिरी करताना त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. आता यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान आणि झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात सोशल वॉर सुरू झाला आहे आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा त्याची मजा लुटत आहे.

T20 World Cup, Semi Finals qualification : ... तर झिम्बाब्वे सेमी फायनलला जाणार, भारत किंवा द. आफ्रिका यांच्यापैकी एकाला संधी मिळणार


झिम्बाब्वेने ८ बाद १३० धावा केल्या. वेस्ली मॅधेव्हेर ( १७) व क्रेग एर्व्हिन ( १९) यांनी आक्रमक सुरूवात केली, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. सिन विलियम्स ( ३१) याने चांगला संघर्ष केला. रायन बर्ल ( १०) व ब्रॅड एव्हान्स ( १९) यांचेही योगदान लाभले. पाकिस्तानच्या मोहम्मद वासीमने ४ आणि शादाब खानने ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान ( १४) व बाबर आजम (४) अपयशी ठरले. इफ्तिखार अहमद ( ५) व हैदर अली (० ) यांनीही निराश केले. शान मसूद ४४ धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरू ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि १ चेंडूंत ३ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला. पाकिस्तानला ८ बाद १२९ धावा करता आल्या. सिकंदर रजाने ३ व ब्रॅड इव्हान्सने २ विकेट्स घेतल्या.  

झिम्बाब्वेकडून हार, पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद? शेजाऱ्यांचं नशीब टीम इंडियाच्या हाती


झिम्बाब्वेच्या या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्राध्यक्ष इमेर्सन डाम्डूड्झो एमनांगाग्वा ( Emmerson Damdudzo Mnangagwa) यांनी मजेशीर ट्विट केलं. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे कौतुक करताना पाकिस्तानला पुढच्या वेळेत खरा Mr Bean पाठवा असा सल्ला दिला.  


झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटवर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ ( Shehbaz Sharif) खवळले आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले की, भले आमच्याकडे खरा Mr Bean नसेल, परंतु आमच्याकडे खरी खिलाडूवृत्ती आहे. पाकिस्तानींना दमदार पुनरागमन करण्याची सवय आहे.  


दोघांच्या या वादात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मजा घेतली. त्याने लिहिले की, Mr President यांनीही चांगली खेळी खेळली. शेजाऱ्यांची दुखती नस पकडली.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, ZIM vs PAK :Pakistan PM Shehbaz Sharif , Zimbabwe’s President Emmerson Damdudzo Mnangagwa exchange jibes after Zimbabwe stuns Pakistan, Virender Sehwag joins the FUN 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.