T20 World Cup, ZIM vs PAK : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजय नोंदवला. ग्रुप २ मधील गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला १ धावेने हार मानण्यास त्यांनी भाग पाडले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १ धावेने पराभूत होण्याची ही पाकिस्ताची दुसरी वेळ आहे. २०१०मध्ये न्यूझीलंडने त्यांना असे पराभूत केले होते, परंतु काल झालेला हा पराभव पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी कारणीभूत ठरणारा आहे. भारताकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान या सामन्यातून कमबॅक करेल अशी अपेक्षा होती, परंतु झिम्बाब्वेने अनपेक्षित कामगिरी करताना त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. आता यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान आणि झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात सोशल वॉर सुरू झाला आहे आणि भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) हा त्याची मजा लुटत आहे.
झिम्बाब्वेकडून हार, पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद? शेजाऱ्यांचं नशीब टीम इंडियाच्या हाती
झिम्बाब्वेच्या या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्राध्यक्ष इमेर्सन डाम्डूड्झो एमनांगाग्वा ( Emmerson Damdudzo Mnangagwa) यांनी मजेशीर ट्विट केलं. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे कौतुक करताना पाकिस्तानला पुढच्या वेळेत खरा Mr Bean पाठवा असा सल्ला दिला.
दोघांच्या या वादात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मजा घेतली. त्याने लिहिले की, Mr President यांनीही चांगली खेळी खेळली. शेजाऱ्यांची दुखती नस पकडली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"