Join us  

What is FAKE Mr. BEAN Matter? पाकिस्तानचा इथेही खोटारडेपणा, झिम्बाब्वेने ऐतिहासिक विजयानंतर काढली लाज

T20 World Cup, ZIM vs PAK What is FAKE Mr. BEAN Matter?  झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर Mr Bean ट्रेंड सुरू झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:28 AM

Open in App

T20 World Cup, ZIM vs PAK What is FAKE Mr. BEAN Matter?  झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर Mr Bean ट्रेंड सुरू झाला. इतकेच काय तर झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्षांनीही या Mr Bean प्रकरणावरून पाकिस्तानचे कान टोचले. काल झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धक्कादायक विजयाची नोंद करताना पाकिस्तानवर १ धावेने रोमहर्षक विजय मिळवला. भारताकडून पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान या सामन्यातून कमबॅक करेल अशी अपेक्षा होती, परंतु झिम्बाब्वेने अनपेक्षित कामगिरी करताना त्यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.  

झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांचं 'ट्विट' पाकिस्तानच्या पंतप्रधानांना झोंबलं; वीरूने घेतली मजा

झिम्बाब्वेने ८ बाद १३० धावा केल्या. वेस्ली मॅधेव्हेर ( १७) व क्रेग एर्व्हिन ( १९) यांनी आक्रमक सुरूवात केली, परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. सिन विलियम्स ( ३१) याने चांगला संघर्ष केला. रायन बर्ल ( १०) व ब्रॅड एव्हान्स ( १९) यांचेही योगदान लाभले. पाकिस्तानच्या मोहम्मद वासीमने ४ आणि शादाब खानने ३ विकेट्स घेतल्या. पाकिस्तान हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. पण, मोहम्मद रिझवान ( १४) व बाबर आजम (४) अपयशी ठरले. इफ्तिखार अहमद ( ५) व हैदर अली (० ) यांनीही निराश केले. शान मसूद ४४ धावांवर बाद झाल्यानंतरही मोहम्मद नवाजने संघर्ष सुरू ठेवला होता. पण तोही अखेरच्या षटकात बाद झाला आणि १ चेंडूंत ३ धावा हव्या असताना शाहिन आफ्रिदी रन आऊट झाला. पाकिस्तानला ८ बाद १२९ धावा करता आल्या. सिकंदर रजाने ३ व ब्रॅड इव्हान्सने २ विकेट्स घेतल्या.   काय आहे बनावटी Mr Bean प्रकरण?हे २०१६ सालातील प्रकरण आहे. पाकिस्तानी कॉमेडियन असिफ मुहम्मद, ज्यांना Mr Pak Bean  म्हणून ओळखले जाते, त्यांनी हरारे येथे खरा Mr Bean ब्रिटीश अभिनेता रोवन ऍटकिन्सनचे यांची नकल करून विनोद सादर केले होते. त्यानंतर ट्विटरवर  वर एनगुगी चासुरा यांनी स्पष्ट केले: “त्यांनी आम्हाला कृषी शो नावाच्या एका स्थानिक कार्यक्रमात खऱ्या Mr Bean ऐवजी Pak Bean दिला. आम्हाला आमच्या कुटुंबांसमोर लाज वाटली” या ट्विटनुसार पाकिस्तानने झिम्बाब्वेमधील एका कार्यक्रमाला फेक मिस्टर बीन पाठवला होता. त्यावरून हा वाद सुरू झाला. 

झिम्बाब्वेच्या या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्राध्यक्ष इमेर्सन डाम्डूड्झो एमनांगाग्वा ( Emmerson Damdudzo Mnangagwa) यांनी मजेशीर ट्विट केलं. त्यांनी झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे कौतुक करताना पाकिस्तानला पुढच्या वेळेत खरा Mr Bean पाठवा असा सल्ला दिला.  झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटवर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरिफ ( Shehbaz Sharif) खवळले आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले की, भले आमच्याकडे खरा Mr Bean नसेल, परंतु आमच्याकडे खरी खिलाडूवृत्ती आहे. पाकिस्तानींना दमदार पुनरागमन करण्याची सवय आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ऑफ द फिल्डझिम्बाब्वेपाकिस्तान
Open in App