Join us  

India Vs Pakistan T20 Live : हर्षा भोगले यांच्या भारत-पाकिस्तान Playing XI मधून KL Rahul, रिषभ, कार्तिक आऊट

India Vs Pakistan Int T20 2022 Live Match : मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. लाखाहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत आणि जगभरात हा सामना पाहता यावा यासाठी ब्रॉडकास्टर्सनीही कंबर कसली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 8:35 AM

Open in App

India Vs Pakistan Int T20 2022 Live Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेतील २३ ऑक्टोबर ही तारीख इतिहास घडवणारी ठरणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. लाखाहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत आणि जगभरात हा सामना पाहता यावा यासाठी ब्रॉडकास्टर्सनीही कंबर कसली आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत बाबत आजमच्या संघाने बाजी मारली होती आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वचपा काढण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. IND vs PAK लढतीतूनच दोन्ही संघांचा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास सुरू होणार आहे. India Vs Pakistan Live T20 Match

आशिया चषक २०२२ स्पर्धेतही उभय संघ दोनवेळा समोरासमोर आले आणि १-१ अशी बरोबरी राहिली. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकली आहे. पण, अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी खूप मार खाल्ला आणि रोहितसाठी ती चिंतेची बात आहे. दुसरीकडे पाकिस्तानने न्यूझीलंड-बांगलादेश विरुद्धच्या तिरंगी मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे बाबर आजम अँड टीमचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्यात शाहिन शाह आफ्रिदीच्या पुनरागमनाने संघाची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. Ind vs Pak Live T20 Match

अशात भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी समालोचक हर्षा भोगले यांनी दोन्ही संघांची मिळून एक प्लेइंग इलेव्हन टीम तयार केली आहे आणि त्यात ६ भारतीय व ५ पाकिस्तानी खेळाडूंची निवड त्यांनी केलीय. रोहित शर्मा व बाबर आजम यांची ओपनिंगसाठी निवड करताना भोगले यांनी  लोकेश राहुलला संघाबाहेर केले. विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कायम राखताना मोहम्मद रिझवानला पाचव्या क्रमांकावर ठेवले आहे. अशात दिनेश कार्तिक व रिषभ पंत या दोन्ही भारतीय यष्टीरक्षकांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही.

हार्दिक पांड्या व शादाब खान हे दोन अष्टपैलू भोगले यांच्या संघात आहेत. अक्षर पटेल हा सप्राईज पॅकेज ठरला. मोहम्मद शमी, शाहिन आफ्रिदी व हॅरिस रौफ यांच्यावर जलदगती गोलंदाजीची जबाबदारी सोपवली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानलोकेश राहुलरिषभ पंतदिनेश कार्तिक
Open in App