India Vs Pakistan Int T20 2022 Live Match : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेतील २३ ऑक्टोबर ही तारीख इतिहास घडवणारी ठरणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.. लाखाहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत आणि जगभरात हा सामना पाहता यावा यासाठी ब्रॉडकास्टर्सनीही कंबर कसली आहे. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत बाबत आजमच्या संघाने बाजी मारली होती आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वचपा काढण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. IND vs PAK लढतीतूनच दोन्ही संघांचा यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास सुरू होणार आहे. अशात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा ( Ramiz Raja) यांनी बेस्टम बेस्ट कामगिरी करण्याचा सल्ला दिला आहे. India Vs Pakistan Live T20 Match
टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूसाठी आमची रणनीती तयार; मुख्य फलंदाजाची माघार तरीही Babar Azamची डरकाळी
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पलीकडे दुसरा-तिसरा विचारच करू नकोस, ट्रॉफी घरी घेऊन ये असा सल्ला रमीझ राजा यांनी Babarला भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी दिला. ते म्हणाले,''वर्ल्ड कप ही मानसिक कसोटी पाहणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेत स्वतःवरील विश्वास खचू न देता स्वप्नपूर्तीच्या दिशेने ( वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याच्या ) वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकणे हे एकच ध्येय ठेऊन मैदानावर उतरा. जिंकण्याशिवाय या स्पर्धेत दुसरा पर्याय नाही.'' Ind vs Pak Live Scoreboard
१९९२च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या रमीझ राजा यांनी पाकिस्तानी खेळाडूंना काही टिप्सही दिल्या. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांना खेळताना नेहमी अडचण जाणवली आहे. त्यामुळे त्यांनी फटका मारण्याचा वेग वाढवायला हवा आणि तंत्रातही गती आणायला हवी. कारण, येथे चेंडू प्रचंड वेगाने तुमच्यासमोर येतो. पाकिस्तानात खेळताना फलंदाज चेंडूला फटका मारण्यासाठी वेळ घेतो, परंतु ऑस्ट्रेलियात तसं करून चालणार नाही, असं रमीझ राजा Geo News शी बोलताना म्हणाले.India vs Pakistan T20 Int Live Match
यावेळी त्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना संघाच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 Worldcup 2022 India Vs Pakistan T20 Live : I have asked Babar Azam there should be kept no other option in mind other than bringing the trophy of T20 WorldCup back home, PCB Chairman Ramiz Raja
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.