India Vs Pakistan Int T20 2022 Live Match : भारतीय संघाला मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा सर्व काही सुरळीत वाटत असताना रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्याची ३० टक्केच शक्यता असल्याचा दावा केला. पण, माजी कर्णधार व BCCIचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याने रोहित शर्माच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. India Vs Pakistan Live T20 Match
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मधील कामगिरी हा इतिहास झाला. त्यानंतर भारतीय संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि त्यामुळे किती काळ जुनी कामगिरीचा उल्लेख करत बसाल, असा सवाल गांगुलीने टीकाकारांना केला. इंडिया टूडेशी बोलताना गांगुली म्हणाला,''मागे काय घडलं, यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदांमध्ये टीम इंडिया फेव्हरिट आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हानं ही पूर्णपणे वेगळी असतात. या दोन-तीन आठवड्यांत जो संघ चांगला खेळतो, तो छाप पाडून जातो. आपला संघही मजबूत आहे. बिग हिटर संघात आहे.'' India vs Pakistan T20 Int Live Match
सौरव गांगुलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीसाठीच्या चार संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेची निवड केली. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण जलदगती गोलंदाजांची फौज आहे आणि ऑस्ट्रेलियात तेच प्रभावशाली ठरतील, असे मत गांगुलीने व्यक्त केले. तो म्हणाला, उपांत्य फेरीत मी भारतासह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांची निवड करतो. दक्षिण आफ्रिकेकडे चांगले गोलंदाज आहेत आणि ऑस्ट्रेलियातील खेळपट्टींवर ते प्रभावी ठरतील. IND vs PAK Match scoreboard
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 Worldcup 2022 India Vs Pakistan T20 Live : Sourav Ganguly picked his top four for the tournament, while adding that Team India will be one of the favourites
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.