सिडनी: प्रथमच आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया भारतीय महिला क्रिकेट संघाला टी२० विश्वचषकाच्या सलामीला शुक्रवारी यजमान ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान परतवून लावावे लागणार आहे.
मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्यात येत असलेले अपयश ही भारताची कमकुवत बाजू आहे. भारताने ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठली. त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकलाही, मात्र अंतिम सामना भारताने गमावला. सहापैकी चार वेळा विश्वचषकाचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकविले आहे.
येथे बाद फेरीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत करायचे असेल तर भारताच्या मधल्या आणि तळाच्या फळीला चांगला खेळ दाखवावाच लागेल. त्याचवेळी भारताची मुख्य मदार आघाडीच्या फलंदाजांवर असेल. गेल्या काही सामन्यांत आघाडीच्या फलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखला आलेले नाही. त्याचप्रमाणे, मधली फळी वारंवार कोसळू नये याची काळजी संघ व्यवस्थापनाला घ्यावी लागेल. युवा शेफाली वर्माकडून भारताला बºयाच अपेक्षा आहेत. याशिवाय सातत्यपूर्ण कामगिरीत अपयशी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडूनही आशा आहेत. तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात खेळलेली रिचा घोष हिला पुन्हा संधी मिळणार का, हे पहावे लागेल.
गोलंदाजीत भारत फिरकीपटूंवर विसंबून आहे. संघात चांगले वेगवान गोलंदाज नाहीत. अशावेळी शिखा पांडे हिच्या फिरकी माºयाकडून बºयाच आशा असतील. मागच्या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य सामन्यात पराभूत झाला. यंदा मात्र संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रिचा घोष, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, शेफाली वर्मा, पूनम यादव आणि राधा यादव
ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), एरिन बर्न्स, निकोला कारे, अॅश्ले गार्डनर, रशेल हॅन्स, एलिसा हीली, जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी एम, बेथ मूनी, एलिस पैरी, मेगान शट, अन्नाबेल सदरलॅन्ड, मोली स्ट्रानो, जॉर्जिया वेयरहॅम.
सामना: उद्या दुपारी १.३० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार).
Web Title: T20WorldCup: Indian women play against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.