Corona Virusमुळे पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलली; पण शाहिद आफ्रिदीला चिंता जेतेपदाच्या चषकाची

कोरोना व्हायरसचा जगभरातील क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगचे उपांत्य व अंतिम फेरीचे सामनेही पुढे ढकलण्याचा निर्णय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:17 PM2020-03-17T16:17:08+5:302020-03-17T16:18:24+5:30

whatsapp join usJoin us
‘Table-topper Multan Sultans should be handed the trophy?’- Shahid Afridi reacts to the postponement of PSL 2020 svg | Corona Virusमुळे पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलली; पण शाहिद आफ्रिदीला चिंता जेतेपदाच्या चषकाची

Corona Virusमुळे पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलली; पण शाहिद आफ्रिदीला चिंता जेतेपदाच्या चषकाची

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसचा जगभरातील क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल २०२०) १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगचे उपांत्य व अंतिम फेरीचे सामनेही पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. सहा संघाचा समावेश असलेली ही लीग २० फेब्रुवारीपासून सुरू झाली. प्रथमच ही लीग पूर्णपणे पाकिस्तानात खेळवण्यात आली आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळवला. ३० सामन्यानंतर चार संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान, लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला. पण, उपांत्य सामन्यापूर्वी ही लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या लीगचे सामने पुढे केव्हा खेळवले जातील, याबाबत अद्याप माहीती देण्यात आलेली नाही. त्यात या स्पर्धेत सहभागी झालेला इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्समध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, या निर्णयानंतर पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीनं केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.

आफ्रिदीनं लिहीलं की,''पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलण्याने वाईट वाटते, परंतु लोकांचे आरोग्य व सुरक्षा महत्त्वाची आहे. विशेष करून जे मायदेशात परतत आहेत त्यांची काळजी, घेणे गरजेचे आहे. हा निर्णय आधीच घेता आला असता. आता चषकाचा विचार केल्यास, गटातील अव्वल स्थानावर असलेल्या संघाला मिळायला हवा?''


आफ्रिदीच्या मते मुल्तान सुल्तान संघाला जेतेपद मिळायला हवं. मुल्तान सुल्तान संघानं १४ गुणांसह गटात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ कराची किंग्स ( ११), लाहोर कलंदर ( १०) आणि पेशावर झाल्मी ( ९) यांचा क्रमांक येतो. 

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी

शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!

Shocking : २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाचा Corona Virusमुळे मृत्यू, क्रीडा क्षेत्रातील पहिला बळी

स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या ३५% खेळाडूंना Corona Virusची लागण

Corona Virusच्या भीतीनं जग थांबलंय अन् इंग्लंडची क्रिकेटपटू भटकंती करतेय

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर परिणाम? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मोठी अपडेट

MS Dhoni घरी परतताच पत्नी साक्षीनं घेतली शाळा, भरला सज्जड दम

Big Breaking: इंग्लंडच्या सलामीवीराला कोरोना? पाकिस्तान सुपर लीगमधून माघार 

 

Web Title: ‘Table-topper Multan Sultans should be handed the trophy?’- Shahid Afridi reacts to the postponement of PSL 2020 svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.