कोरोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजरूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांची आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. पायी किंवा मिळेत त्या वाहनानं शेळ्या-मेंढऱ्यांसारखा त्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. पायी जाणारे हे कामगार भूकेनं व्याकुळ, अहस्य झाल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते फोटो पाहताना प्रत्येकाच्या मनाला वेदना होत आहे. अशा स्थलांतरितांच्या मदतीसाठी भारताचा क्रिकेटपटू रस्त्यावर उतरला आहे.
भारतापाठोपाठ Sania Mirzaची पाकिस्तानलाही मदत; गरजूंसाठी केलं मोठं दान!
किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू खेळाडू तेजींदर सिंग ढिल्लोन रस्त्यावर उतरून स्थलांतरित मजूरांना अन्न व पाणी वाटत आहे. त्यानं आतापर्यंत 10 हजार स्थलांतरित मजूरांना अन्न व पाण्याचं वाटप केलं आहे. राजस्थानचा हा 27 वर्षीय खेळाडू स्वतः हायवेवर उभा राहून या मजूरांना अन्न वाटताना दिसत आहे. तो म्हणाला,''कानपूर येथील मुख्य हायवे माझ्या घरापासून 100 मीटर अंतरावर आहे. दिल्लीवरून घराकडे जाणारे अनेक मजूर याच मार्गानं जाताना दिसत आहेत. या मजूरांसाठी आपण काहीतरी करायला हवं, हे मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर मी माझ्या मित्रांशी संपर्क साधला आणि या मजूरांसाठी काही तरी करण्याची योजना आखली.''
''आमच्या सोसायटीमध्ये एका व्यक्तीचा भाजीचा व्यावयसाय आहे, त्यांना मी बटाटे आणि काही भाज्या देण्याची विनंती केली. कॉलोनीमधून आम्ही जवळपास 50 किलो पीठ गोळा केलं आणि आम्ही 1400 चपात्याही वाटल्या. पहिल्या दिवशी आम्ही 1000 मजूरांना मदत केली आणि त्यानंतर हा आकडा 5000 पर्यंत गेला. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. पूरीभाजीसह आम्ही दूध आणि सरबतही देत आहोत,'' असंही तो म्हणाला.
सुपर मॉडलसोबत झालाय इरफान पठाणचा विवाह; Social Mediaवर तिचे फोटो व्हायरल!
Read in English
Web Title: Tajinder Singh Dhillon has started distributing food and water to over 10000 refugees svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.