कोरोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजरूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांची आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड सुरू आहे. पायी किंवा मिळेत त्या वाहनानं शेळ्या-मेंढऱ्यांसारखा त्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. पायी जाणारे हे कामगार भूकेनं व्याकुळ, अहस्य झाल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते फोटो पाहताना प्रत्येकाच्या मनाला वेदना होत आहे. अशा स्थलांतरितांच्या मदतीसाठी भारताचा क्रिकेटपटू रस्त्यावर उतरला आहे.
भारतापाठोपाठ Sania Mirzaची पाकिस्तानलाही मदत; गरजूंसाठी केलं मोठं दान!
किंग्स इलेव्हन पंजाबचा अष्टपैलू खेळाडू तेजींदर सिंग ढिल्लोन रस्त्यावर उतरून स्थलांतरित मजूरांना अन्न व पाणी वाटत आहे. त्यानं आतापर्यंत 10 हजार स्थलांतरित मजूरांना अन्न व पाण्याचं वाटप केलं आहे. राजस्थानचा हा 27 वर्षीय खेळाडू स्वतः हायवेवर उभा राहून या मजूरांना अन्न वाटताना दिसत आहे. तो म्हणाला,''कानपूर येथील मुख्य हायवे माझ्या घरापासून 100 मीटर अंतरावर आहे. दिल्लीवरून घराकडे जाणारे अनेक मजूर याच मार्गानं जाताना दिसत आहेत. या मजूरांसाठी आपण काहीतरी करायला हवं, हे मी माझ्या कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर मी माझ्या मित्रांशी संपर्क साधला आणि या मजूरांसाठी काही तरी करण्याची योजना आखली.''
सुपर मॉडलसोबत झालाय इरफान पठाणचा विवाह; Social Mediaवर तिचे फोटो व्हायरल!