नवी दिल्ली : ‘आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती, पण ड्रग्स बाळगणे त्यापेक्षा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे,’ अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केली आहे. पंजाबचे सहमालक नेस वाडियाला जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे वाडिया व किंग्स इलेव्हन पंजाब संघावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाडिया ग्रुप हा देशातील सर्वांत जुन्या व्यावसायिक ग्रुपपैकी एक आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च महिन्यात न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे २५ ग्राम गांजा सापडला. ‘वाडियावर क्रिकेटसंदर्भात आजीवन बंदी घालावी,’ अशी मागणीही या वरिष्ठ अधिकाºयाने केली आहे.
वाडिया प्रकरणी ‘सीओए’ चर्चा करणार
नेस वाडियाला ड्रग्ससह जपानमध्ये अटक झाल्यानंतर दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली. या प्रकरणी मुंबईत बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या बैठकीतही चर्चा होणार आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार संघाशी जुळलेली कोणतीही व्यक्ती खेळाची बदनामी करू शकत नाही. एका कलमानुसार, संघ निलंबित सुद्धा होऊ शकतो. जसे स्पॉट फिक्सिंगप्रकरणात चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. असे असले तरी या प्रकरणावर बीसीसीआयचा निर्णय अजून स्पष्ट झालेला नाही. हे प्रकरण नैतिक समिती आणि नवनियुक्त लोकपाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
यासंदर्भात, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या प्रकरणावर मुंबईत ३ मे रोजी होणाऱ्या सीईओच्या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीतील चर्चा सीईओ हे न्यायमूर्ती जैन आणि तीन अधिकाऱ्यांपुढे ठेवतील. आमच्याकडे नैतिक अधिकाऱ्याच्या रूपात सर्वाेच्य न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे सोपविले जाईल.’
Web Title: Take action on King XI! A senior BCCI official has demanded
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.