Join us

युवी म्हणतोय, नुसते सिक्सर मारू नकोस रे! पण अभिषेक काय ऐकेना!

युवराज सिंग याने जो व्हिडिओ शेअर केल्या त्यात तो अभिषेक शर्माला क्रिकेटचे धडे देताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 13:11 IST

Open in App

"जेवढे सिक्सर मारशील तेवढ्याच सिंगल धावा काढशील"; अभिषेकसाठी युवीची खास पोस्ट

भारताचा उद्योत्मुख खेळाडू आणि IPL सुपरस्टार अभिषेक शर्मा उत्तुंग फटकेबाजीसह ओळखला जातो. या डावखुऱ्या फलंदाजात अनेकांना युवराज सिंगची झलकही दिसते. पण तुम्हाला माहितीये का? त्याचा गुरु दुसरा तिसरा कोणी नसून युवराज सिंगच आहे. 

युवा क्रिकेटर अभिषेकला क्रिकेटचे धडे देताना दिसतोय युवी 

आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून स्फोटक अंदाजात खेळताना दिसलेला अभिषेक शर्मा हा मूळचा पंजाबचा आहे. हा क्रिकेटरचा जन्म ४ सप्टेंबर २००० साली पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. त्याच्या बर्थडेच्या दिवशी युवराज सिंगनं एक पोस्ट शेअर करत या युवा क्रिकेटला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकानंतर अभिषेकनं युवीला केलेला व्हिडिओ कॉल

अभिषेक शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. आपल्या पहिल्या शतकी खेळीनंतर त्याने युवी पाजीला व्हिडिओ कॉल केल्याची गोष्टही पाहायला मिळाली होती. जी या दोन क्रिकेटमधील कमालीची केमिस्ट्री दाखवून देणारी होती. त्यात आता युवीच्या नव्या पोस्टची भर पडली आहे.

आता अभिषेकसाठी युवराज सिंगची खास पोस्ट

युवराज सिंग याने जो व्हिडिओ शेअर केल्या त्यात तो अभिषेक शर्माला क्रिकेटचे धडे देताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये युवीनं अभिषेकचा उल्लेख सर असा केल्याचे दिसून येते.  

हॅप्पी बर्थडे अभिषेक सर, अपेक्षा करतो की, या वर्षी तू जितके षटकार मारशील तेवढ्याच एकेरी धावा देखील काढशील. कठोर परिश्रम घेत राहा.

 

ट्रेनिंग सेशनमध्ये युवराज सिंग अभिषेकला एकेरी धाव घेण्याचा सल्ला देताना दिसते. पण युवा क्रिकेटर फक्त  मोठ्या फटकेबाजीला पसंती देताना दिसतोय. त्यामुळे युवी त्याला हटके अंदाजा एकेरी धावाचे महत्त्व पटवून देताना दिसते.  

टॅग्स :युवराज सिंगभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबाद