Join us  

‘बुमराहच्या अनुपस्थितीत बलस्थानांचा लाभ घेतोय’

Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर आशिया चषकात अपयशी ठरला. त्यानंतरच्या मालिकांमध्येही तो प्रभावी ठरला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 8:00 AM

Open in App

सिडनी : जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. तरी सध्या गोलंदाजांनी त्याची पोकळी भरून काढण्यासाठी  रणनीतीत कुठलाही बदल केलेला नाही. आपली ताकद ओळखून त्याचा पुरेपूर वापर करीत असल्याचे मत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने व्यक्त केले. 

भुवनेश्वर आशिया चषकात अपयशी ठरला. त्यानंतरच्या मालिकांमध्येही तो प्रभावी ठरला नव्हता. विश्वचषकात मात्र आतापर्यंत तो भेदक ठरला. बुमराहच्या अनुपस्थितीत अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात का, यावर भुवी म्हणाला, ‘बुमराहचे विश्वचषकात नसणे आमच्यासाठी धक्कादायक आहे. मात्र त्यामुळे अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात, असे मुळीच नाही. आमची बलस्थाने ओळखून त्यानुसार प्रयत्न करीत असल्याने यश मिळत आहे.’

 ‘आशिया चषक ही मोठी स्पर्धा असल्याने चाहत्यांच्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करू शकलो नाही. आता विश्वचषकादरम्यान मी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे माझ्याबाबत काय लिहून येते, याकडे लक्ष नाही. सोशल मीडियावर नको त्या चर्चा होत असतात.’- भुवनेश्वर कुमार

टॅग्स :भुवनेश्वर कुमारट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App