Join us  

Video : रिषभ पंत घेतोय 'hydrotherapy'! दुखापतीतून सावरण्यासाठी करतोय अथक परिश्रम, रवी शास्त्री म्हणाले... 

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( rishabh pant) याची उणीव प्रकर्षाने जाणवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 5:08 PM

Open in App

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( rishabh pant) याची उणीव प्रकर्षाने जाणवली. नॅथन लाएनच्या फिरकीवर भारतीय फलंदाज बाद होत असताना रिषभ हवा होता, असेच सर्वांना वाटत होते. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली असली तरी रिषभ असता तर मालिकेत आणखी मजा नक्की आली असती... २०२१च्या ऐतिहासिक मालिका विजयात रिषभ टीम इंडियाचा सदस्य होता आणि त्यांनी एकहाती ऑसी गोलंदाजांची त्यांच्याच घरी धुलाई केली होती. पण, दुर्दैवाने त्याच्या गाडीचा अपघात झाला अन् तो आता क्रिकेटपासून दूरावला आहे.  

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh pant Accident) याचा काही महिन्यांपूर्वी विचित्र अपघात झाला.. या अपघातातरिषभ पंतला बराच मार लागला आणि तो आता बराच काळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक फोटो पोस्ट केला होता आणि त्यात तो कुबड्यांच्या सहाय्याने चालत असल्याचे दिसला.३० डिसेंबर २०२२ मध्ये पहाटे ५.३० वाजता दिल्ली-डेहरादून हायवेवर रिषभच्या गाडीचा भिषण अपघात झाला होता. या अपघातामुळे त्याला इंडियन प्रीमिअर लीग २०२३ सोबतच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागू शकते. तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. 

रिषभने ३३ कसोटी सामन्यांत ४३.६७च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ३० वन डे व ६६ ट्वेंटी-२०त अनुक्रमे ८६५ व ९८७ धावा त्याच्या नावावर आहेत. रिषभने बुधवारी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात तो कुबड्यांच्या सहाय्याने स्विमींगपूलमध्ये चालताना दिसतोय. याला 'hydrotherapy' असे म्हणतात आणि रिषभला लवकर बरं होण्यासाठी ती गरजेची आहे. रिषभने लिहिले की, लहान गोष्टी, मोठ्या गोष्टी आणि मधल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ 

रिषभच्या या पोस्टवर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही किप इट गोईंग पँटी असे लिहिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ
Open in App