Syed Mushtaq Ali T20 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची फायनल अत्यंत थरारक झाली. तामिळनाडू व कर्नाटक हे कट्टर प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे साऱ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती. त्यात 2019च्या फायनलमध्ये कर्नाटकनं 1 धावेनं तामिळनाडूला पराभूत करून जेतेपद पटकावले होते. तसाच थरार आजच्या सामन्यातही पाहायला मिळाला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना शाहरूख खाननं ( Shahrukh Khan) खणखणीत षटकार खेचून तामिळनाडूला जेतेपद पटकावून दिलं. तामीळनाडूचं हे सलग दुसरं जेतेपद आहे. Syed Mushtaq Ali Trophy 2021 आयपीएलमध्ये शाहरूख पंजाब किंग्सकडून खेळतो.
प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकनं 7 बाद 151 धावा केल्या. अभिनव मनोहर ( 46) आणि प्रविण दुबे ( 33) यांनी कर्नाटकसाठी चांगला खेळ केला. आर साई किशोरनं सुरुवातीलाच दिलेल्या धक्क्यांमुळे कर्नाटक बॅकफूटवर गेला. साई किशोरनं 12 धावांत 3 विकेट्स घेतल्या. संदीप वॉरियर्स, संजय यादव व टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. प्रत्युत्तरात हरी निशांत ( 23) व नारायण जगदीसन ( 41) यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु तामिळनाडूच्या मधल्या फळीनं निराश केलं.
अखेरच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना प्रतिक जैनच्या पहिल्याच चेंडूवर साई किशोरनं चौकार मारला आणि त्यानंतर एक धाव घेत शाहरूख खानला स्ट्राईक दिली. त्यानंतर एक Wide चेंडू पडला. पुढील दोन चेंडूंवर प्रत्येकी 1-1 धाव आणि पुन्हा Wide चेंडू...पाचव्या चेंडूवर दोन धाव घेतल्यानंतर 1 धाव 5 अशा धावा तामीळनाडूला करायच्या होत्या. शाहरुखनं अखेरचा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावला अन् तामीळनाडूनं विजयी जल्लोष केला. शाहरूखनं 15 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 33 धावा केल्या.
तामिळनाडूनं 2006/07, 2020/21 व 2021/22 अशी तीन जेतेपद नावावर केली आहेत. 2009/10मध्ये महाराष्ट्र, 2010/11 मध्ये बंगाल, 2011/12 व 2013/14 मध्ये बरोडा, 2012/13 व 2014/15 मध्ये गुजरात, 2015/16 मध्ये उत्तर प्रदेश, 2016/17 पूर्व विभाग, 2017/18 मध्ये दिल्ली आणि 2018/19 व 2019/20 मध्ये कर्नाटक
Web Title: Tamil Nadu required 5 off the last delivery and Shah Rukh Khan smashed it into the stands for Six, amil Nadu are SMAT Champions Trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.