नवी दिल्ली : बांग्लादेशचा अनुभवी आक्रमक फलंदाज तमिम इक्बाल याने तिरंगी मालिकेदरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावताना कोणत्याही मैदानावरील सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रचला.तमिमने झिम्बाव्बेविरुद्ध ७६ धावांची खेळी केली. यासह शेर ए बांग्ला राष्ट्रीय स्टेडियमवरील त्याच्या एकूण २,५४९ धावा झाल्या. यासह त्याने श्रीलंकेचा दिग्गज माजी फलंदाज सनथ जयसूर्याचा विश्वविक्रम मागे टाकला. जयसूर्याने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर २,५१४ धावा फटकावल्या आहेत. तमिमने शेर ए बांग्ला स्टेडियमवर एकूण ७४ सामने खेळले असून येथे त्याने ५ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.कोणत्याही एका मैदानावर सर्वाधिक धावांचा विक्रम रचणाºया तमिम आणि जयसूर्यानंतर पाकिस्तानचा इंझमाम उल हक (२,४६४ शारजाह स्टेडियम), बांग्लादेशचा शाकिब अल हसन (२,३६९ शेर ए बांग्ला), पाकिस्तानचा सईद अन्वर (२,१७०, शारजाह) आणि बांग्लादेशचा मुशफिकर रहीम (२,१७१ शेर ए बांग्ला) यांचा क्रमांक आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- तमिम इक्बालने रचला धावांचा विश्वविक्रम, सनथ जयसूर्याला टाकले मागे
तमिम इक्बालने रचला धावांचा विश्वविक्रम, सनथ जयसूर्याला टाकले मागे
बांग्लादेशचा अनुभवी आक्रमक फलंदाज तमिम इक्बाल याने तिरंगी मालिकेदरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावताना विश्वविक्रम रचला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:24 AM