नागपूर - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात नागपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याने श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दसून शनाका अडचणीत सापडला आहे. त्यानं केलेल्या चुकीची कबुलीही दिली आहे. या प्रकरणी आयसीसीनं त्याच्यावर कारवाई केली आहे. चेंडूशी छेडछाड केल्यामुळे श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज दसुन शनाकाला आयसीसीनं सामन्याच्या मानधनापैकी 75 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे.
चेंडूशी छेडछाड करताना शनाका कॅमेऱ्यात कैद झाला होता. आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांच्यासमोर दसून शनाकानं चूक झाल्याचं मान्यही केलं. त्याला सामन्याच्या मानधनापैकी 75 टक्के रक्कम दंड म्हणून आकारला आहे. तसंच शनाकाला समजही दिली. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शनाकानं त्याची चूक मान्य केली असून, त्यामुळे या मुद्द्यावर आता कोणत्याही औपचारिक सुनावणीची गरज नाही, असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.
सामन्यावर भारताची मजबूत पकड -
दुसऱ्या कसोटी सामन्यावर भारतानं मजबूत पकड मिळवली आहे. विराट-रोहितनं तिसऱ्य़ा दिवशी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सहा बाद 610 धावांवर भारतानं डाव घोषित केला. भारताकडे 405 धावांची आघाडी आहे. श्रीलंकेनं दुसर्या डावात फलंदाजी करताना खराब सुरुवात केली आहे. इशांत शर्मानं श्रीलंकेला दुसऱ्या चेंडूवर पहिला धक्का दिला. सलामिवीर सदीरा समारिविक्रा शुन्य धावांवर त्रिफाळाबाद झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा लंकेच्या एकबाद 19 धावा झाल्या होत्या.
Web Title: Tampering ball; Sri Lanka's bowlers turn down, ICC action
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.