Join us

रोहित, विराट आणि बुमराह नसेल तर आम्ही भारताचा सहज पराभव करू; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं विधान

श्रीलंकेने वन डे मालिकेत २-० ने टीम इंडियाचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 19:34 IST

Open in App

Virat Kohli And Rohit Sharma : अलीकडेच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने २-० ने टीम इंडियाचा पराभव करून मालिका खिशात घातली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेत दारुण पराभव पत्करावा लागला. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित झाल्यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकून यजमानांनी २-० ने मालिका खिशात घातली. आता टीम इंडिया मायदेशात परतली आहे. भारताचा पराभव होताच पाकिस्तानचा माजी खेळाडू तन्वीर अहमद बरळला. त्याने टीम इंडियावर टीका करताना एक अजब दावा केला.

टीम इंडियाने स्वत:च्या कामगिरीकडे लक्ष द्यावे. मग पाकिस्तानला सल्ले द्यायला हवेत. जर रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळले नाहीत तर पाकिस्तान भारताचा सहज पराभव करेल. भारतासारख्या बलाढ्य संघाचा श्रीलंकेने दारूण पराभव केला, असे तन्वीर अहमदने सांगितले. तो त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी तिन्ही वन डे सामने खेळले. पण, हे अनुभवी खेळाडू संघाचा भाग असतानाही भारताला पराभव टाळता आला नाही. रोहित शर्मा वगळता एकाही भारतीय फलंदाजाला संपूर्ण मालिकेत साजेशी कामगिरी करता आली नाही. 

श्रीलंकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत रोहित शर्मा वगळता एकाही भारतीय खेळाडूला साजेशी खेळी करता आली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडिया लक्ष्याचा पाठलाग करत होती. पण, एकाही सामन्यात त्यांना विजय साकारता आला नाही. सलामीचा सामना भारताने जिंकलाच होता पण अखेरीस अर्शदीपच्या एका चुकीमुळे श्रीलंकेने तोंडचा घास पळवला आणि सामना अनिर्णित संपवला. मग पुढचे दोन्ही सामने जिंकून यजमानांनी २-० ने मालिका आपल्या नावावर केली. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहलीरोहित शर्माजसप्रित बुमराहऑफ द फिल्ड