ठळक मुद्दे. सचिन तेंडुलकर बलबीरचंद याचा मुलगा सौरव हा देखील सचिनचा मुलगा अर्जुनसारखाच हुबेहूब दिसतो ‘ये तो कुदरतका खेल है,’ असे म्हणत हा दैवी योगायोग असल्याचे बलबीरचंद सांगतो.बलबीरचंद हा सचिन तेंडुलकर याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे
सोलापूर, दि. 30 - तब्बल 20 वर्षांहून अधिक काळ भारतरत्न मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची हुबेहूब छबी घेऊन जगभर गाजलेल्या ज्यु. सचिन तेंडुलकर बलबीरचंद याचा मुलगा सौरव हा देखील सचिनचा मुलगा अर्जुनसारखाच हुबेहूब दिसतो अन् आता तोही ‘ज्यु. अर्जुन तेंडुलकर’ म्हणून नावारूपास येऊ शकतो. ‘ये तो कुदरतका खेल है,’ असे म्हणत हा दैवी योगायोग असल्याचे बलबीरचंद सांगतो.
बलबीरचंद काल सोलापुरात आला होता. त्याच्याशी संवाद साधताना या योगायोगाचा उलगडा झाला. बलबीरचंद हा सचिन तेंडुलकर याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे तर त्याचा मुलगा सौरव हा सचिनचा मुलगा अर्जुनपेक्षा नऊ महिन्यांनी मोठा असल्याचे त्यानेच सांगितले.
१९८९ नंतर जसजशी सचिनशी क्रिकेट कारकीर्द बहरत गेली तसतशी त्याचा डुप्लीकेट बलबीरचंद याचीही ज्यु. सचिन तेंडुलकर म्हणून कारकीर्द बहरली. सचिनचा डुप्लीकेट म्हणून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. आता त्याचा मुलगा सौरव हा देखील हुबेहूब अर्जुन तेंडुलकरसारखा दिसतो. अर्जुन क्रिकेटमध्ये आपले नशीब आजमावत आहे. सौरव मात्र कला शाखेत बारावीपर्यंत शिकून आता नृत्यकलेत आपले नैपुण्य दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. कोरिओग्राफी क्षेत्रात परिश्रम करून मोठा कोरिओग्राफर बनण्याचे सौरवचे स्वप्न असल्याचे बलबीरचंद सांगतो. सचिनच्या वलयाचा फायदा बलबीरला झाला. जगभरात त्याचे स्वागत झाले. आता अर्जुन तेंडुलकर क्रिकेट जगतात कशी कामगिरी करतो यावरच ज्यु. अर्जुन तेंडुलकरचे भवितव्य आहे.
सारा अन् सिमरन
सचिन तेंडुलकरला सारा ही कन्या आहे. बलबीरचंद यालादेखील एक कन्या आहे व तिचे नाव सिमरन आहे. सिमरनच्या जन्मादिवशीच सचिनने डबल सेंच्युरी मारली होती हे बलबीर कौतुकाने सांगतो. सचिनचा तर तुझा मुलगा सचिनच्या मुलाचा डुप्लीकेट, हे कसे? असे छेडले असता बलबीर हात जोडतो आणि म्हणतो ‘मेरे लिए सचिनजी भगवान समान है । मेरा और मेरे परिवार का कुछ ना कुछ कनेक्शन है ।’
Web Title: tao-sacainacaa-tara-tayaacaa-maulagaahai-arajauna-taendaulakaracaa-daupalaikaeta
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.