Join us  

टीम इंडियाकडून 468 धावांचे टार्गेट, वेस्ट इंडिजच्या 2 बाद 45 धावा 

पहिल्या डावात बुमराहने 27 धावांत 6 गडी बाद करीत वेस्ट इंडीजचे पहिले पाच फलंदाज तंबूत धाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 4:50 AM

Open in App

किंग्जस्टन : हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. यासह भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार करायचे आहे. 

भारताने 117 धावांत डाव गुंडाळूनही वेस्ट इंडिजला यजमानांवर फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला नाही. भारताच्या 467 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचे 45 धावांवर 2 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी 423 धावांची गरज असून दोन दिवस आणि 8 फलंदाज त्यांच्याकडे आहेत. दरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने नाबाद 64 तर हनमा विहारीने नाबाद 53 धावांची खेळी केली. 

पहिल्या डावात बुमराहने 27 धावांत 6 गडी बाद करीत वेस्ट इंडीजचे पहिले पाच फलंदाज तंबूत धाडले. यात त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली. कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवणारा बुमराह हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज बनला. शनिवारी बुमराहच्या भेदकतेला यजमान संघाच्या फलंदाजांकडे उत्तरच नव्हते. याशिवाय मोहम्मद शमीनेही २ बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. तसेच इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बुमराहने सातव्या षटकांत विकेट घेण्याची मालिका सुरू केली. सर्वात आधी त्याने जॉन कॅम्पबेलला बाद केले. त्याचा झेल ऋषभ पंतने लीलया घेतला. त्यानंतर नवव्या षटकात बुमराहने सलग चेंडूंत डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रुक्स आणि रॉस्टन चेज यांना तंबूत धाडत आपला दबदबा निर्माण केला. ब्राव्होचा झेल दुसºया स्लीपमध्ये उभ्या असणाºया लोकेश राहुलने घेतला आणि पुन्हा पुढील दोन चेंडूंवर ब्रुक्स व चेज यांना पायचीत केले.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराह