हैदराबाद : आयपीएल प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने हैदराबाद संघ गुरुवारी घरच्या मैदानावर गुजरात संघाविरुद्ध भिडेल. गुजरातचे आव्हान संपुष्टात आले असल्याने ते विजय मिळवून या सत्राचा सकारात्मकतेने निरोप घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. हैदराबादचे दोन सामने शिल्लक असून, ते सध्या १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दोन्ही सामने जिंकून १८ गुणांसह पहिल्या दोन स्थानांमध्ये येण्याची संधीही आहे.
हैदराबाद
एक आठवड्याच्या विश्रांतीने मैदानावर उतरताना हैदराबादचे सर्व संघ पूर्ण ताजेतवाने होऊन खेळतील. ट्रॅविस हेड व अभिषेक शर्मा या धडाकेबाज सलामीवीरांकडून स्फोटक फलंदाजीची अपेक्षा असेल. भुवनेश्वर कुमार, कर्णधार पॅट कमिन्स, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर यांच्या उपस्थितीत गोलंदाजी भक्कम आहे.
गुजरात
कोणत्याही दडपणाशिवाय खेळणार असल्याने गुजरात संघ धोकादायक बनला आहे. हेड आणि अभिषेक या सलामीवीरांना झटपट बाद केल्यास गुजरात संघ अर्धी लढाई जिंकेल. कर्णधार शुभमन गिल-साई सुदर्शन या सलामीवीरांकडून पुन्हा दमदार सुरुवातीची अपेक्षा. डेव्हिड मिलरकडून आशा. गुजरातला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल.
सामना : सायंकाळी ७.३० पासून