इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मोठी डिल झाली... TATA समुहाने पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे टायटल हक्क जिंकले आहेत आणि यापुढे २०२८ पर्यंत TATA IPL असेच पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलने टायटल हक्कासाठी जाहीरात काढली होती आणि आदित्य बिर्ला ग्रुप यासाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त होते, परंतु 'TATA' ने बाजी मारली. हाती आलेल्या वृत्तानुसार या डिलमुळे आयपीएल मालामाल झाले आहे.
इन्व्हिटेशन टू टेंडर (ITT) दस्तऐवजात नमूद केलेल्या अटींनुसार, टाटाला इतर कॉर्पोरेट संस्थेने केलेल्या कोणत्याही स्पर्धात्मक ऑफरशी जुळवून घेण्याचा विशेषाधिकार होता. या तरतुदीच्या अनुषंगाने, समूहाने आदित्य बिर्ला समूहाने सादर केलेल्या २५०० कोटींच्या ऑफरचा स्वीकार केला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता टाटा दरवर्षी आयपीएलला ५०० कोटी देणार आहे.
२०२२ मध्ये Vivo ने माघार घेतल्याने टाटाने टायटल राईट्स जिंकले होते. Vivo ने २०१८ मध्ये पाच वर्षांसाठी २१९९ कोटी रुपयांत टाटा चे टायटल राईट्स जिंकले होते. त्यानंतर शेवटच्या वर्षात ५१२ कोटी दिले गेले आणि ही डिल सहा वर्षांची झाली. पण, भारत आणि चीन यांच्यातल्या वाढल्या राजकीय तणावामुळे Vivo ने माघार घेतली आणि तेव्हा TATA ने ३६५ कोटी प्रती पर्व देऊन टायटल राईट्स जिंकले. मागील दोन पर्वात याच किमतीत TATA ने टायटल राईट्ससाठी ३६५ कोटीच दिले होते.
आयपीएल २०२४ केव्हा पासून सुरू होणार? भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका ११ मार्चला संपतेय आणि बरोबर ११ दिवसांनी म्हणजेच २२ मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2024) ला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुका असूनही आयपीएल पूर्णपणे भारतातच खेळवण्याचा निर्धार बीसीसीआयने केला आहे.
Web Title: TATA retain IPL title rights until 2028, The agreement involves a commitment to contribute INR 500 crore per season.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.