Join us

TATA WPL Auction 2025 : या महिला खेळाडूवर लागली पहिली बोली; Gujarat Giants नं खेळला कोट्यवधीचा डाव

या मिनी लिलावात सहभागी असलेल्या १२० महिला खेळाडूंमध्ये  वेस्ट इंडिजची स्टार ऑल राउंडर डिआंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिच्यावर पहिली बोली लागली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 15:54 IST

Open in App

TATA WPL Auction 2025, Deandra Dottin SOLD for INR 1.7 Crore Gujarat Giants : महिला आयपीएल अर्थात महिला प्रीमिअर लीग (WPL 2025) च्या हंगामासाठी तगडी संघ बांधणी करण्यासाठी ५ फ्रँचायझी संघ बंगळुरु येथील वुमन्स  प्रीमिअर लीग मिनी लिलावात (WPL 2025) सहभागी झाले आहेत. या मिनी लिलावात सहभागी असलेल्या १२० महिला खेळाडूंमध्ये  वेस्ट इंडिजची स्टार ऑल राउंडर डिआंड्रा डॉटिन (Deandra Dottin) हिच्यावर पहिली बोली लागली.

कॅरेबियन स्टार ऑल राउंडर खेळा़डूवर पहिली बोली, मिळाला मूळ किंमतीपेक्षा तिप्पट भाव

५० लाख या मूळ किंमतीसह मिनी लिलावात उतरलेल्या कॅरेबियन स्टारला संघात सामील करून घेण्यासाठी यूपी वॉरियर्ज आणि गुजरात जाएंट्स या फ्रँयायझी संघात तगडी फाइट पाहायला मिळाली. शेवटी  १ कोटी ७० लाख एवढी मोठी बोली लावत गुजरातच्या संघाने या अष्टपैलू खेळाडूल आपल्या ताप्यात सामील करून घेतले. 

वर्ल्ड चॅम्पियन अन् बरंच काही

उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या या कॅरेबियन महिला खेळाडूनं टी-२० विश्वचषक २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते. ती छोट्या फॉर्मेटमध्ये शतकी खेळी करणारी पहिली महिला खेळाडू आहे. २०१६ मध्ये वेस्ट इंडिज महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. या वर्ल्ड चॅम्पियन संघाची ती सदस्यही आहे.  तिने आपल्या राष्ट्रीय संघासाठी १४३ वनडे आणि १३२ टी२० सामने खेळले आहेत. तिच्या खात्यात एकूण ६५४४ धावांची नोंद असून तिने १३९ विकेट्स पटकावल्या आहेत. 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगगुजरातवेस्ट इंडिज