Team Abu Dhabi vs Bangla Tigers, Abu Dhabi T10 League : भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेत लोकेश राहुल व रोहित शर्मा ( KL Rahul-Rohit Sharma) ही जोडी तुफान फटकेबाजी करत असताना दुसरीकडे दुबईत ४१ वर्षीय ख्रिस गेलनंही ( Chris Gayle) पॉल स्टीर्लिंगच्यासाथीनं धावांचं वादळ आणलं. आजपासून सुरू झालेल्या T10 लीमध्ये स्टीर्लिंग व गेल यांनी बांगला टायगर्स संघाच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम अबु धाबीनं १० षटकांत ४ बाद १४५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात बांगला टायगर्सला ८ बाद १०५ धावाच करता आला आणि टीम अबु धाबीनं ४० धावांनी सामना जिंकला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या अबु धाबी संघाचा सलामीवीर फिल सॉल्ट ( ७) धावबाद झाला व कर्मधार लिएम लिव्हिंगस्टोनही १४ धावा करून माघारी परतला. पण, स्टीर्लिंग व गेल यांनी तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. स्टीर्लिगंनं २३ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ५९ धावा कुटल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अपयशी ठरलेल्या गेलची बॅट इथे चांगली तळपली. त्यानं २३ चेंडूंतं २ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ४९ धावा केल्या.
फलंदाजांनी कमाल दाखवल्यानंतर टीम अबु धाबीच्या गोलंदाजांनीही त्यांची भूमिका चोख वटवली. मर्चंट डी लँगनं २३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. टायगर्सकडून आंद्रे फ्लेचर ( २५) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
Web Title: Team Abu Dhabi vs Bangla Tigers : Paul Stirling 59 in 23 balls & Chris Gayle scored 49 unbeaten in 23 balls with 5 sixes in the Abu Dhabi T10 League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.