Team India: ३० दिवसांत १२ सामने, नववर्षाच्या जोरदार सुरुवातीच टीम इंडिया उत्सुक, असं आहे पूर्ण वेळापत्रक    

Team India Schedule 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ३० दिवसांमध्ये भारतीय संघ टी-२० आणि वनडे मिळून १२ सामने खेळणार आहे. आता २०२३ मध्ये भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:31 PM2022-12-31T13:31:39+5:302022-12-31T13:31:52+5:30

whatsapp join usJoin us
Team India: 12 matches in 30 days, Team India is eager to start the new year with full schedule | Team India: ३० दिवसांत १२ सामने, नववर्षाच्या जोरदार सुरुवातीच टीम इंडिया उत्सुक, असं आहे पूर्ण वेळापत्रक    

Team India: ३० दिवसांत १२ सामने, नववर्षाच्या जोरदार सुरुवातीच टीम इंडिया उत्सुक, असं आहे पूर्ण वेळापत्रक    

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 मावळते २०२२ हे वर्ष भारतीय संघासाठी फारसे उत्साहवर्धक राहिले नव्हते. आता २०२३ मध्ये भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना असेल. अष्टपैलू हार्दिक पांड्या नव्या वर्षाची सुरुवात कर्णधार म्हणून करणार आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ३० दिवसांमध्ये भारतीय संघ टी-२० आणि वनडे मिळून १२ सामने खेळणार आहे.

भारतीय संघ सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळवली जाईल. श्रीलंकेविरुद्धची मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी ३ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. हे सर्व सामने ३ जानेवारी ते १ फेब्रुवारी या ३० दिवसांमध्ये खेळवले जातील. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झालेली नाही. या मालिकांचं वेळापत्रक पुढील प्रमाणे आहेत 

भारत विरुद्ध श्रीलंका 
टी-२० मालिका वेळापत्रक 

पहिला सामना ३ जानेवारी मुंबई 
दुसरा सामना  ५ जानेवारी पुणे 
तिसरा सामना  ७ जानेवारी राजकोट 

वनडे मालिका 
पहिला सामना १० जानेवारी गुवाहाटी
दुसरा सामना १२ जानेवारी कोलकाता 
तिसरा सामना १५ जानेवारी तिरुवनंतपुरम

भारत विरुद्ध न्यूझीलंड 
वनडे मालिका 

पहिला सामना १८ जानेवारी हैदराबाद 
दुसरा सामना २१ जानेवारी रायपूर 
तिसरा सामना २४ जानेवारी इंदूर 
 
टी-२० मालिका 
पहिला सामना २७ जानेवारी रांची
दुसरा सामना २९ जानेवारी लखनौ 
तिसरा सामना १ फेब्रुवारी अहमदाबाद

श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका आटोपल्यावर  भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेमध्ये एकूण ४ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. 

Web Title: Team India: 12 matches in 30 days, Team India is eager to start the new year with full schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.