लॉडेरहिल (अमेरिका) : विश्वचषक स्पर्धेत आव्हान संपुष्टात आल्यानंतर, टीम इंडियामध्ये गटबाजी असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहलीने अफवा टाळून लावल्या होत्या. आज, शनिवारपासून वेस्ट इंडिज दौºयाला सुरुवात होणार आहे. या दौºयात भारतीय संघ तीन टी-२०, तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळेल. पहिला टी-२० सामना अमेरिकेतल्या मियामी शहरात रंगणार असून त्यासाठी संघ अमेरिकेत दाखल झाला आहे.
विंडीज दौºयावर रवाना होण्याआधी कर्णधार कोहलीने या मालिकेचा उद्देश युवा खेळाडूंचा शोध घेणे हा असल्याचे म्हटले होते. कोहलीला मर्यादित षटकांच्या सामन्यात विश्रांती देण्याची चर्चा सुरू होती, पण त्याने स्वत: खेळण्याचा निर्णय घेताच बुमराह वगळता बलाढ्य संघ निवडण्यात आला. बुमराह २२ आॅगस्टपासून सुरू होणाºया कसोटी मालिकेत खेळणार आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या याला मात्र संपूर्ण दौºयातून विश्रांती देण्यात आली. श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे यांना स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्याचे आव्हान असेल. पांडेने अखेरचा सामना नोव्हेंबर २०१८ आणि अय्यरने फेब्रुवारी २०१८ला खेळला होता.
भारतापुढे अखेर आव्हान असेल ते मधल्या फळीचे अपयश संपविण्याचेच. पांडे आणि अय्यर यांना आपल्या कामगिरीद्वारे ही डोकेदुखी संपवावी लागणार आहे. फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी तसेच दीपकचा भाऊ राहुल चाहर हे देखील संघात आहेत. रोहित शर्मा शिखरसोबत डावाची सुरुवात करणार असून लोकेश राहुल चौथ्या स्थानावर खेळेल. या दौºयात ऋषभ पंतवर अधिक जबाबदारी असेल. तो पहिला यष्टिरक्षक म्हणून येथे आला आहे.
दुसरीकडे टी-२० प्रकारात सर्वांत धोकादायक विंडीज संघात कीरोन पोलार्ड आणि फिरकीपटू सुनील नरेन यांचा समावेश आहे. ख्रिस गेल हा मात्र वन डे मालिकेत खेळेल. जखमी आंद्रे रसेल याला टी-२० संघात स्थान मिळाले आहे. विंडीजचे कोच फ्लाईड रीफर म्हणाले, ‘संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे. सामने रोमहर्षक होतील. चाहत्यांचे चांगले मनोरंजन होईल.’ (वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋ षभ पंत, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉंिशग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर व नवदीप सैनी .
वेस्ट इंडिज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शिमरोन हेटमायेर, निकोलस पूरन, कीरोन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नारायण, शेल्डन कोटरेल, ओशेन थामस, एंथोनी ब्रेंबल, आंद्रे रसेल, केरी पियरे.
सामन्याची वेळ : रात्री ८ पासून. (भारतीय वेळेनुसार)
Web Title: Team India again in the field in t-20 west indies series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.